शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

्रपशुधन विकास अधिकाऱ्यांची पदे भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:05 IST

राज्यभरात सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांच्या अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे : शासनाकडे पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यभरात सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांच्या अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. शासनाने सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांची पदे भरावी या मुख्य मागणीसाठी सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षकांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन सादर केले.निवेदनात म्हटले आहे की, पशुवैद्यकीय दवाखाण्याच्या मंजूर ढाचाप्रमाणे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ वर संस्थाप्रमुख म्हणून सहायक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन पर्यवेक्षक व एक परिचर ही दोनच कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्याकडे १० ते १५ गावांचा व्याप आहे. आजारी जनावरांना पशुवैद्यकीय सेवा द्यावी लागते. त्याचबरोबर पशुसंवर्धन विषयक सेवाही द्याव्या लागतात. एका अधिकाऱ्याकडे दोन ते तीन दवाखान्यांचा प्रभार सोपविण्यात आला आहे. हा सर्व व्याप सांभाळताना पशुधन अधिकाºयांची चांगलीच दमछाक उडत आहे. त्यामुळे पशुधन अधिकाऱ्यांची पदे भरावी, सहायक पशुधन विकास अधिकारी ते पशुधन विकास अधिकारी गट-ब पदोन्नती द्यावी, ग्रामसेवक, कृषी सहायकांप्रमाणे दरमहा प्रवास भत्ता मंजूर करावा, राज्य स्तरावरील पशुधन पर्यवेक्षक ते सहायक पशुधन विकास अधिकारी पदावर पदोन्नती द्यावी, खात्याच्या पुनररचनेसंदर्भात संघटनेने दिलेल्या प्रस्तावानुसार सुधारणा करावी, बारावीनंतर तीन वर्षांचा पशुसंवर्धन विषयक पदविका अभ्यासक्रम सुरू करावा, राज्यस्तरीय कर्मचाऱ्यांची पहिली व दुसरी कालबद्ध पदोन्नती मंजूर करावी आदी मागण्यांंचा समावेश आहे. याच मागण्यांसाठी यापूर्वी १५ मे २०१७ रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पशुसंवर्धन मंत्री यांची भेट घेवून चर्चा केली होती. मागण्या माण्य करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले होते. मात्र यापैकी एकही मागणी पूर्ण झाली नाही. संघटनेच्या वतीने यानंतर राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. यावेळी जिल्हाभरातील सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक उपस्थित होते.