शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

गोदामाअभावी आरमोरीतील धान खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 22:37 IST

विलास चिलबुले। लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने आरमोरी येथे यंदाच्या खरीप हंगामात धान ...

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे प्रचंड दुर्लक्ष : आतापर्यंत केंद्रांवर केवळ २५ टक्केच झाली धानाची खरेदी

विलास चिलबुले।लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने आरमोरी येथे यंदाच्या खरीप हंगामात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र आतापर्यंत झालेल्या धान खरेदीने येथील तीन गोदाम फुल्ल झाले. आता गोदामाअभावी आरमोरी येथील या केंद्रावरील धान खरेदी बंद पडली आहे.मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने धान खरेदीसाठी येथे तीन गोदाम मंजूर करण्यात आले. आतापर्यंत या केंद्रावर ९ हजार ६०० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. या धानाने तिनही गोदाम पूर्ण भरले आहेत. शासनाने गोदामातील धान्याची उचल न केल्याने पुन्हा जवळपास ३१ हजार क्विंटलची धान खरेदी शिल्लक आहे. खासगी व्यापाऱ्यांनी नगदी पैसे देण्याचे आमिष दाखवून कमी भावात धान खरेदी करण्याचा सपाटा लावला असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. अशा स्थितीत लवकरात लवकर गोदाम उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडे केली. त्यानंतर पाठपुरावाही केला. मात्र या मागणीकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पूर्णत: दुर्लक्ष केले, असा आरोप शेतकऱ्यांनी केला.मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आरमोरी तालुक्यात धानाचे उत्पादन चांगल्या प्रमाणात झाले आहे. शासनाकडून हमीभाव धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आरमोरी येथील मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर धान विक्रीसाठी आणले आहेत. त्यांनी विक्रीचा क्रमांकही लावला आहे. मात्र महिना उलटूनही काही शेतकऱ्यांचा धानाचा काटा झाला नाही. अद्यापही या केंद्रावरील ७५ टक्के शेतकरी धानविक्रीच्या प्रतीक्षेत असून मोठ्या अडचणीत सापडला आहे. लक्ष देण्याची मागणी आहे.फेडरेशनला खासगी गोदाम देण्यास नकारमार्केटिंग फेडरेशनच्या वतीने आरमोरी येथील धान खरेदीसाठी खासगी गोदाम भाडे तत्त्वावर दरवर्षी घेतले जाते. यंदाही खासगी गोदामासाठी फेडरेशनच्या वतीने प्रयत्न करण्यात आले. मात्र फेडरेशनकडे गेल्या पाच-पाच वर्षांपासूनचे गोदाम भाडे शिल्लक असल्याने यावर्षी फेडरेशनला भाडेतत्त्वावर देण्यास अनेकांनी नकार दिला आहे. यावरून फेडरेशनचा भोंगळ कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे.आदिवासी विकास महामंडळ नाशिककडून गोदाम नसलेल्या केंद्रावर खुल्या जागेत ओट्यावर धान खरेदीला परवानगी देण्यात आली असल्याने महामंडळाची धान खरेदी जोरात सुरू आहे. मात्र मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर शासनाने उघड्यावर धान खरेदीसाठी मंजुरी दिली नाही. महामंडळाच्या धर्तीवर उघड्यावर धान खरेदी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :MarketबाजारFarmerशेतकरी