कोरोना विषाणूचा संसर्ग राेखण्यासाठी संचारबंदी आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकल्यास कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे पानठेले बंद ठेवण्याचे व किराणा दुकानातून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, शासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत तंबाखूजन पदार्थांची विक्री सुरूच आहे. नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदार भंडारी यांनी शहरी व ग्रामीण भागात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व उघड्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. या पथकाच्या माध्यमातून कोरची शहरातील एकूण १२ किराणा दुकानांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, तीन दुकानांमध्ये ६४० रुपये किमतीचे सिगारेट पॉकेट, ३ हजार रुपयांची बिडी, ३ रुपयांचा तंबाखू, ६०० रुपयांची तपकीर व २७० रुपयांचा सुगंधित तंबाखू आढळून आला. सदर माल पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी तिन्ही दुकानदारांवर एकूण ६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यानंतर जप्त करण्यात आलेला मुद्देमाल नगरपंचायतमध्ये जमा करुन होळी करण्यात आली. या मोहिमेत पोलीस विभागाचे कर्मचारी हेमंत ताटपलान, प्रवेश राऊत, नगरपंचायत कर्मचारी व मुक्तिपथ चमू सहभागी झाले.
===Photopath===
160421\16gad_2_16042021_30.jpg
===Caption===
तंबाखूजन्य पदार्थ नष्ट करताना न.पं., पोलीस कर्मचारी व मुक्तिपथ चमू.