शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला जाळणाऱ्या पतीस शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 23:27 IST

दारुसाठी पैसे न दिल्याने पत्नीच्या अंगावर केरोसीन ओतून तिला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न करणाºया पतीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

ठळक मुद्देतीन वर्षांचा कारावास : जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दारुसाठी पैसे न दिल्याने पत्नीच्या अंगावर केरोसीन ओतून तिला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न करणाºया पतीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. लालाजी पुंडलिक सोरपे रा. मौशीखांब, ता. गडचिरोली असे दोषी इसमाचे नाव आहे.ही घटना २७ आॅक्टोबर २०१६ ची आहे. या दिवशी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास आरोपी लालाजी सोरपे याने पत्नीला दारु पिण्यासाठी पैसे मागितले. परंतु तिने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे लालाजीने पत्नी स्वयंपाक करीत असताना तिच्यावर केरोसीन ओतून पेटते कोलीत तिच्या अंगावर फेकले. यामुळे ती ४५ टक्के जळाली. गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान तिचे बयाण घेण्यात आले. या बयाणाच्या आधारे आरोपी लालाजी सोरपे याच्यावर आरमोरी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पूर्ण झाल्यावर तत्कालिन सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम साखरे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.साक्ष पुरावा तपासून व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून प्रमुख सत्र न्यायाधीश संजय मेहरे यांनी आरोपी लालाजी सोरपे यास भारतीय दंड विधानचे कलम ३०७ अन्वये तीन वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास तीन महिन्यांची अतिरिक्त शिक्षा ठोठावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी काम पाहिले.कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांनी जबाबदारी सांभाळली.

टॅग्स :Crimeगुन्हा