शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

जनतेचा अपेक्षाभंग होणार नाही

By admin | Updated: November 19, 2014 22:42 IST

जनतेने ज्या अपक्षेने आपल्याला आमदार म्हणून निवडून दिले आहे, त्या अपेक्षांचा भंग होऊ देणार नाही, असे आश्वासन आमगाव विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार संजय पुराम यांनी दिले.

संजय पुराम : सालेकसात जाहीर सत्कार कार्यक्रमात दिली ग्वाहीसालेकसा : जनतेने ज्या अपक्षेने आपल्याला आमदार म्हणून निवडून दिले आहे, त्या अपेक्षांचा भंग होऊ देणार नाही, असे आश्वासन आमगाव विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार संजय पुराम यांनी दिले. सालेकसा येथे आयोजित जाहीर सत्कार समारंभात ते संबोधित करीत होते.भारतीय जनता पक्ष सालेकसा तालुका कार्यकारिणीच्या वतीने आ.पुराम यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा भाजपाध्यक्ष विनोद अग्रवाल तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार व विधानसभा प्रभारी केशव मानकर, माजी आमदार भेरसिंह नागपुरे, राकेश शर्मा, जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, पं.स. सभापती छाया बल्हारे, तालुका भाजपाध्यक्ष खेमराज लिल्हारे आमगाव, तालुकाध्यक्ष येशुलाल उपराडे, महामंत्री सुभाष आकरे, विरेंद्र अंजनकर, नरेंद्र वाजपेयी व इतर मान्यवर उपस्थित होते. पुराम पुढे म्हणाले की, आमगाव विधानसभा क्षेत्र अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने आपल्यासारख्या एका छोट्या शेतकऱ्यांच्या मुलाला आमदार होण्याचे सौभाग्य लाभले. सामान्य गोरगरिबांना लोकांच्या सहवासात राऊन त्यांच्यासोबत काम करीत असल्यामुळे आपल्याला माहित आहेत की त्यांच्या वेदना काय आहेत. त्यामुळे त्यांच्या मनातील अपेक्षा समजून घेणे याला प्रथम प्राधान्य द्यावे लागते. यासाठी वरिष्ठांशी सल्लामसलत घ्यायला मागेपुढे पाहणार नाही. सालेकसा तालुक्यात सर्वाधिक मनाधिक्य दिल्याबद्दल सालेकसा तालुका कार्यकारिणीचे तसेच जेष्ठ नेते राकेश शर्मा आणि त्यांच्या चमुचे आभार मानले. या प्रसंगी गुणवंत बिसेन, शंकर मडावी, माजी सभापती श्रावण राणा, माजी पं.स. सभापती बाबुलाल उपराडे, जि.प. सदस्य कल्याणी कटरे, प्रेमलता दमाहे, बजरंग दलाचे प्रल्हाद वाढई, बद्रीप्रसाद दसरिया, मनोज इळपाते, रुपा भुरकूडे, मनोज विश्वकर्मा, संगीता सहारे, प्रतिभाा परिहार, मेहतर दमाहे, युवा मोर्चा अध्यक्ष मनोज दमाहे, संदीप डेकाटे, रहांगडाले व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी केशव मानकर, भैरसिंग नागपुरे, राकेश शर्मा, उपराडे, परिहार यांनी ही समयोचित मार्गदर्शन केले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष खेमराज लिल्हारे यांनी केले. तालुक्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी कशा प्रकारे परिश्रम घेतले याचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे संचालन महामंत्री परसराम फुंडे यांनी तर आभार उमेदलाल जैतवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी मुन्ना शर्मा, बाबा दमाहे, राजू बोपचे, अजय वशिष्ठ, यादव नागपूरे, बाबा परिहार, झनक बल्हारे, सुदेश जनबंधु यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)