शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

‘मेडीगड्डा’ प्रकल्पावर आज पोचमपल्लीत जनसुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:18 IST

महाराष्टÑ आणि तेलंगणाच्या सीमेवर होऊ घातलेल्या मेडीगट्टा कालेश्वर सिंचन प्रकल्पासंदर्भात बुधवारी सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथे जनसुनावणी होणार आहे.

ठळक मुद्देतीव्र विरोधानंतरही काम सुरू : नागरिकांना विश्वासात न घेता तेलंगणासाठी प्रशासनाच्या पायघड्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्टÑ आणि तेलंगणाच्या सीमेवर होऊ घातलेल्या मेडीगट्टा कालेश्वर सिंचन प्रकल्पासंदर्भात बुधवारी सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथे जनसुनावणी होणार आहे. प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर होत असलेल्या या जनसुनावणीबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. सोबतच या प्रकल्पाला असलेला नागरिकांचा विरोध पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तेलंगणा सरकारच्या पुढाकाराने होत असलेल्या या मोठ्या प्रकल्पामुळे तेलंगणातील हजारो हेक्टर शेतजमिनीला पाणी मिळणार आहे. मात्र त्यासाठी महाराष्टÑातील हजारो शेतकºयांच्या शेतजमिनी पाण्याखाली जाणार आहे. त्यामुळे गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. पण त्या विरोधाला न जुमानता या प्रकल्पाचे काम तेलंगणा सरकारने सुरूही केले आहे.गोदावरील लवादानुसार महाराष्टÑातून वाहणाºया गोदावरी, प्राणहिता या नद्यांच्या पाण्यावर तेलंगणाचा हक्क असला तरी त्यासाठी प्रकल्पग्रस्त नागरिकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. याशिवाय राज्य शासनाच्या वतीने रितसर सर्व प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. मात्र त्याला न जुमानता तेलंगणा सरकार मनमानी करून जनभावनेचा अनादर करीत आहे. तरीही राज्य शासनातील लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनातील अधिकारी कोणताही आक्षेप न घेता तेलंगणा सरकारच्या तालावर नाचत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.या प्रकल्पात आपली शेतजमीन जाऊन गावेही उठविली जाणार हे समजल्यानंतर नागरिकांचा विरोध वाढू लागला. मोर्चेही काढण्यात आले. पण प्रशासनातील अधिकारी, राज्य सरकारचे प्रतिनिधी अशा कोणीच त्यांचा आवाज ऐकला नाही. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून सर्वकाही ‘सेट’ केल्याचे काही जाणकार सांगतात.ंवरातीमागून घोडे कशासाठी?कोणत्याही प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू करण्याआधीच प्रकल्पग्रस्त नागरिकांची जनसुनावणी घेऊन त्यांच्या अपेक्षा ऐकून घेऊन त्यांचे समाधान करणे, त्यांचा विरोध शांततेच्या मार्गाने शमविणे गरजेचे असते. पण मेडीगट्टा प्रकल्पाच्या बाबतीत मात्र पूर्णपणे मनमानी कारभार सुरू आहे. जनभावनेचा आदर न करता आधीच भूमिपूजन कार्यक्रम उरकून सर्व कामे सुरू करण्यात आली. असे असताना आता जनसुनावणीची औपचारिकता पूर्ण करून ‘वरातीमागून घोडे’ नाचविण्याचा प्रकार कशासाठी? असा प्रश्न उपस्थित होतो.फायदा काय? प्रशासनच अनभिज्ञया प्रकल्पात सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांना फटका बसणार आहे. त्यांना विस्थापित होण्यासोबतच त्यांची शेतजमिनही पाण्याखाली जाणार आहे. या प्रकल्पाच्या पाण्याचा वापर मात्र तेलंगणातील शेतकºयांना करता येणार आहे. प्रत्यक्षात किती शेतकºयांची किती जमीन या प्रकल्पात जाणार, महाराष्टÑातील किती हेक्टर शेतजमिनीला या प्रकल्पाचा फायदा होणार, धरणाची उंची किती राहणार, प्रकल्पग्रस्तांना मोबदला किती मिळणार, इतर काय फायदे मिळणार याबाबत महाराष्टÑ शासनाच्या संबंधित यंत्रणांकडेही पुरेशी माहिती नाही. असे असतानाही जिल्हा प्रशासन यासंदर्भात तेलंगणाच्या हिताची भूमिका का घेत आहे, असा प्रश्न प्रकल्पग्रस्तांना पडला आहे. यासंदर्भात खरंच प्रशासनाकडे माहिती नाही, की प्रशासनाकडून लपवाछपवी केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.