आरमोरी : लोक माहिती अभियानाच्या निमित्ताने बुधवारी आरमोरी येथे जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीला आरमोरीचे तहसीलदार मनोहर वलथरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी भारत सरकारच्या पत्र सूचना कार्यालय नागपूरचे सहायक संचालक संजय आर्वीकर, नागपूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी मनोज सोनोने, रामचंद्र सोनसळ, बी. पी. रामटेके, महात्मा गांधी कला, वाणिज्य, विज्ञान व नसरूद्दीन भाई पंजवानी वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रमेश ठोंबरे, प्रा. नोमेश मेश्राम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे प्रा. हंसराज बडोले, प्रा. धनराज श्रीखंडे, हितकारिणी महाविद्यालयाचे प्रा. उदाराम दिघोरे आदी उपस्थित होते. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीने आरमोरी येथे २८ ते ३० जानेवारी या कालावधीत लोक माहिती अभियान महात्मा गांधी कला, विज्ञान महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची जनजागृती करण्यासाठी सदर रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत महात्मा गांधी कला, विज्ञान व नसरूद्दीन भाई पंजवानी वाणिज्य महाविद्यालय, हितकारिणी महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)
लोक माहिती अभियानानिमित्त जनजागृती रॅली
By admin | Updated: January 28, 2016 01:23 IST