लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आजचे शिक्षण महागडे झाले आहे. शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याने सर्वांना समान शिक्षण मिळणे कठीण झाले आहे. सर्वांना समान शिक्षण मिळाले पाहिजे हे शासनाचे धोरण असले तरी गरीब परिस्थितीमुळे अनेक हुशार व गुणवंत विद्यार्थी मागे पडतात. गडचिरोली शहरात नगर पालिकेच्या १० शाळा आहेत. या शाळांचा शैक्षणिक दर्जा पूर्वीपेक्षा सुधारला असला तरी काही प्रमाणात भौतिक सुविधांचा अभाव आहे. शहरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार व सोयीसुविधायुक्त शिक्षण मिळावे, यासाठी शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यावर अधिक लक्ष देण्यात येत आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी केले.शनिवार ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी रामनगर येथील नगर पालिकेच्या जवाहरलाल नेहरू शाळेत नगर परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने सेवासन्मान उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार सोहळा पार पडला. कार्यक्रमाला मुख्याधिकारी संजीव ओहोळ, न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शिक्षण सभापती रितू कोलते, महिला व बालकल्याण सभापती लता लाटकर, पाणीपुरवठा सभापती वैष्णवी नैताम, नियोजन सभापती नीता उंदीरवाडे, नगरसेवक प्रमोद पिपरे, गुलाब मडावी, नगरसेविका अल्का पोहणकर, वर्षा बट्टे, अनिता विश्रोजवार, नगरपालिकेचे शिक्षण विभाग प्रमुख ताकसांडे, केंद्रप्रमुख भोयर उपस्थित होते.नगराध्यक्ष योगीता पिपरे पुढे म्हणाल्या, आज सर्व घटकांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शहरातील नगर पालिका शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देऊन आदर्श विद्यार्थी घडवावेत व त्यांचा विकास साधावा.मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांनी नगर पालिकेच्या शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्यावर अधिक भर दिला जाईल, असे सांगून प्रत्येक शाळांनी आपला आराखडा नगरपालिकेकडे सादर करावा, असे आवाहन केले़ याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. नगरपालिका शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपापल्या शाळेतील शैक्षणिक कार्य व राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती प्रोजेक्टरद्वारे सादर केली. कार्यक्रमाला नगरपालिका शाळांचे केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका चन्नावार यांनी केले.या शिक्षकांचा झाला सन्मानइंदिरा गांधी नगर परिषद शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र उईके, जवाहरलाल नेहरू शाळेचे शिक्षक महेंद्र शेडमाके, वीर बाबुराव शेडमाके विसापूर शाळेच्या शिक्षिका सुमित्रा काळे, सावित्रीबाई फुले गोकुलनगर शाळेच्या शिक्षिका मिरा मडावी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संकूल शाळेच्या शिक्षिका रेखा बोबाटे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
भौतिक सोयीसुविधांसह दर्जेदार शिक्षण देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 05:00 IST
आज सर्व घटकांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शहरातील नगर पालिका शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देऊन आदर्श विद्यार्थी घडवावेत व त्यांचा विकास साधावा. मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांनी नगर पालिकेच्या शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्यावर अधिक भर दिला जाईल, असे सांगून प्रत्येक शाळांनी आपला आराखडा नगरपालिकेकडे सादर करावा, असे आवाहन केले़ याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
भौतिक सोयीसुविधांसह दर्जेदार शिक्षण देणार
ठळक मुद्देनगराध्यक्षांचे प्रतिपादन । शिक्षकदिनी गडचिरोलीत सेवा सन्मान उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार सोहळा