शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

एपीएल कार्डधारकांना तत्काळ अन्नधान्याचा पुरवठा करा

By admin | Updated: June 28, 2014 23:34 IST

जिल्ह्यात सरकारी स्वस्त धान्य दुकानातून वितरीत केले जाणारे एपीएलचे धान्य गेल्या ४ महिन्यांपासून जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांना मिळाले नाही. तसेच अनेक कार्डधारकांना केरोसिनचेही वाटप अत्यंत कमी

चुरमुरा : जिल्ह्यात सरकारी स्वस्त धान्य दुकानातून वितरीत केले जाणारे एपीएलचे धान्य गेल्या ४ महिन्यांपासून जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांना मिळाले नाही. तसेच अनेक कार्डधारकांना केरोसिनचेही वाटप अत्यंत कमी प्रमाणात करण्यात येत आहे, अशी तक्रार आ. आनंदराव गेडाम यांच्याकडे ग्राहकांनी केली. आ. गेडाम यांनी पुरवठा विभागाचे सचिव दीपक कपुर यांच्याशी चर्चा करून एपीएल कार्डधारकांना त्वरित धान्य उपलब्ध करावे, अशी मागणी केली आहे. जिल्ह्यात एपीएलकार्डधारकांची संख्या ३६ हजारच्यावर आहे. एपीएल कार्डधारक लाभार्थ्यांना मार्च २०१४ पासून गहू व तांदळाचे स्वस्त धान्य दुकानातून वितरण करण्यात आले नाही. तसेच अनेक कार्डधारकांना केरोसीनही मिळत नसल्याच्या तक्रारी आ. आनंदराव गेडाम यांच्याकडे काशिनाथ पोटफोटे, बेबी सोरते, तुळशीराम काशीकर, दत्तु सोमनकर आदी नागरिकांनी केली होती. याबाबत आ. गेडाम यांनी चौकशी केली असता केंद्र शासनाच्या स्तरावरून मंजूर नियतनप्रमाणे धान्यसाठा वितरीत झाला असल्याची माहिती पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. आ. गेडाम यांनी राज्याच्या अन्न नागरी पुरवठा विभागाचे सचिव दीपक कपुर यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एपीएल अंतर्गत धान्य तत्काळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली. केंद्र सरकार रॉकेलचा कोठा मंजूर नियतनापेक्षा ३४ टक्केच महाराष्ट्राला पुरवठा करीत असल्याने कार्डधारकांना कमी केरोसिन मिळत आहे, अशी माहिती सचिव दीपक कपूर यांनी आ. गेडाम यांना दिली. जिल्ह्यातील एपीएल कार्डधारकांना दहा ते पंधरा दिवसांच्यात आत आवश्यक ते अन्नधान्य देण्यात येईल, असे आश्वासन पुरवठा विभागाच्या सचिवांनी आ. गेडाम यांना दिले आहे. जिल्ह्यातील एपीएल कार्डधारकांना गहू व तांदळाचा पुरवठा केला जाणार असल्याची शक्यता आहे. मागील अनेक दिवसांपासून एपीएल कार्डधारकांचा अन्नधान्य पुरवठा बंद करण्यात आला होता. (वार्ताहर)