शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

क्वॉरंटाईन नागरिकांना सोयीसुविधा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:00 IST

चामोर्शी तालुक्यात आतापर्यंत ६ हजार २३ मजूर व नागरिकांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून तेलंगणा राज्यातून ७ हजार मजूर परत आलेले आहेत. यापैकी १७५ जिल्हाबाहेरील असून १८३ परराज्यातील नागरिक आहेत, अशी माहिती एसडीओ तोडसाम यांनी दिली. चामोर्शी नगर पंचायतअंतर्गत ३०० मजूर असून त्यांना शिवाजी हायस्कूल व जि.प. केंद्र शाळेतील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देआढावा बैठकीत सूचना : चामोर्शी न.पं.क्षेत्रातील विलगिकरण कक्षात ३०० मजूर

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : मिरची तोडण्याच्या कामासाठी आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यात गेलेले मजूर चामोर्शी तालुक्यात परतले असून त्यांना गावातच क्वॉरंटाईन करण्यात आले. त्या नागरिकांना भोजनासह सर्व सोयीसुविधा प्रशासनाने पुरवाव्या, अशा सूचना खा.अशोक नेते यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना केल्या.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खा.नेते यांनी बुधवारी चामोर्शी येथील उपविभागीय कार्यालयात सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कोरोनाची सद्यस्थिती व माहिती जाणून घेतली. याप्रसंगी जि.प.चे कृषी सभापती रमेश बारसागडे, नगराध्यक्ष प्रज्ञा उराडे, चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम, तहसीलदार संजय गंगथळे, ठाणेदार जितेंद्र बोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भूषण लायबल, तालुका कृषी अधिकारी डांगे, बीडीओ माने, मुख्याधिकारी सतीश चौधरी तसेच माजी जि.प.अध्यक्ष बाबुराव कोहळे, भाजपचे जिल्हा सचिव आनंद भांडेकर, आनंद गण्यारपवार, तालुकाध्यक्ष दिलीप चलाख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.चामोर्शी तालुक्यात आतापर्यंत ६ हजार २३ मजूर व नागरिकांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून तेलंगणा राज्यातून ७ हजार मजूर परत आलेले आहेत. यापैकी १७५ जिल्हाबाहेरील असून १८३ परराज्यातील नागरिक आहेत, अशी माहिती एसडीओ तोडसाम यांनी दिली. चामोर्शी नगर पंचायतअंतर्गत ३०० मजूर असून त्यांना शिवाजी हायस्कूल व जि.प. केंद्र शाळेतील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. चामोर्शी येथे शिवभोजन थाळीची क्षमता वाढवावी, एमआरईजीएसची कामे सुरू करून मजुरांना रोजगार द्यावा, नवीन कामे सुरू करावे, रस्ते व पाणीपुरवठ्याची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावी, अशी सूचना खा.नेते यांनी अधिकाºयांना दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या