शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेवटच्या कामगारांपर्यंत लाभ पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:38 IST

शेतकरी व कामगार यांच्या हितासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे प्रतिपादन आ.डॉ.देवराव होळी यांनी केले.

ठळक मुद्देआमदारांचे प्रतिपादन : धानोरा येथे कामगार नोंदणी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : शेतकरी व कामगार यांच्या हितासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे प्रतिपादन आ.डॉ.देवराव होळी यांनी केले.महाराष्ट्रीय इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तसेच महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळ तथा अनुगामी लोकराज्य महाअभियान संस्था यांच्या माध्यमातून अटल विश्वकर्मा सन्मान योजना १९ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत कामगार नोंदणी अभियान राबविले जात आहे. सदर मेळावा धानोरातही आयोजित करण्यात आला. याप्रसंगी आ.डॉ.देवराव होळी मार्गदर्शन करीत होते. शिबिराला तहसीलदार महेंद्र गणवीर, जिल्हा कामगार अधिकारी रवींद्र उईके, अनुलोम संस्थेचे उपविभाग प्रमुख संदीप लांजेवार, सारंग साळवे, भाग जनसेवक रवी कोल्हटकर आदी उपस्थित होते. मेळाव्याला तालुक्यातील शेकडो कामगार उपस्थित होते. पुढे बोलताना आ.डॉ.देवराव होळी म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक कामगारांना या योजनेचा लाभ देण्यासाठी त्यांची नोंदणी करावी, यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.नोंदणी झालेल्या कामगारांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार गणवीर म्हणाले, ही योजना समाजातील प्रत्येक घटकाला डोळ्यासमोर ठेवून निर्माण करण्यात आले आहे. कामगारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कामगार अधिकारी रवींद्र उईके म्हणाले की, मोठ्या संख्येने कामगारांनी नोंदणी करावी, यासाठी प्रशासनाच्या वतीने जनजागृती केली जात आहे. तरीही ज्या नागरिकांना या योजनेविषयी माहिती नाही. त्यांच्यापर्यंत इतर नागरिकांनी माहिती पोहोचवून त्यांना नोंदणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :Devrao Holiदेवराव होळी