शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन मंत्र्यांच्या आवाहनाला आंदाेलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांचा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 05:00 IST

गुरुवारी एकही कर्मचारी रूजू झाला नाही. एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचारी मागील चार महिन्यांपासून  संपावर आहेत. विलीनीकरणाबाबत न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ११ मार्च राेजी याबाबत सुनावणी हाेणार आहे. मात्र विलीनीकरणाचा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा असल्याने यावर ११ मार्च राेजी न्यायालय अंतिम सुनावणी करण्याची शक्यता अतिशय कमी आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : आंदाेलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांनी १० मार्चपर्यंत रुजू व्हावे. त्यांच्यावरील कारवाई मागे घेतली जाईल, असे आवाहन राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी केले हाेते. मात्र या आवाहनाला आंदाेलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. गुरुवारी एकही कर्मचारी रूजू झाला नाही. एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचारी मागील चार महिन्यांपासून  संपावर आहेत. विलीनीकरणाबाबत न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ११ मार्च राेजी याबाबत सुनावणी हाेणार आहे. मात्र विलीनीकरणाचा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा असल्याने यावर ११ मार्च राेजी न्यायालय अंतिम सुनावणी करण्याची शक्यता अतिशय कमी आहे. विलीनीकरणाबाबत  नेमलेल्या समितीनेसुद्धा विलीनीकरण करणे शक्य नाही, असा अहवाल सादर केला. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे आवाहन परिवहनमंत्र्यांनी केले हाेेते. मात्र कर्मचारी संपावर कायम आहेत. 

कारवाई झालेल्यांपैकी एकही कामावर नाही

ज्या एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फ व निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्या कर्मचाऱ्यांपैकी एकही कर्मचारी आतापर्यंत रूजू झाला नाही. ज्यांच्यावर कारवाई नव्हती असे गडचिराेली आगारात १८ व अहेरी आगारात १० कर्मचारी रूजू झाले आहेत. 

अफवांच्या बाजारामुळे गाेंधळ-    विविध सामाजिक माध्यमांतून एसटी कर्मचाऱ्यांमध्ये अफवा पसरल्या आहेत. या अफवांवर एसटी कर्मचारी विश्वास ठेवत आहेत. त्यामुळे मंत्र्यांच्या आवाहनानंतरही ते रुजू हाेण्यास तयार नाहीत. यामुळे त्यांच्यासह एसटीचेही माेठे नुकसान झाले आहे. 

बडतर्फ किंवा निलंबित असल्यास करावा लागेल अर्ज

-    ज्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फ किंवा निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे त्या कर्मचाऱ्यांना रूजू व्हायचे असेल तर त्यांनी विभाग नियंत्रक यांच्याकडे अपील करावे लागेल. डीपीओ, यंत्र अभियंता व विभागीय नियंत्रक यांचा समावेश असलेली समिती निर्णय घेईल. 

-   ज्यांच्यावर कारवाई नाही त्यांनी अर्ज केल्यानंतर त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी पाठविले जाईल. त्यानंतरच रूजू करून घेतले जाईल. 

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप