लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरी येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात बुधवारी अप्पर पोलीस महासंचालक (नक्षल विरोधी अभियान) डी. कनकरत्नम यांच्या हस्ते गडचिरोली जिल्ह पोलीस दलात कार्यरत असणाºया पोलीस उपनिरिक्षक दर्जाच्या अधिकाºयांना सहायक पोलीस निरीक्षक पदी वेगवर्धित पदोन्नती बहाल करण्यात आली.वेगवर्धित पदोन्नती मिळालेल्या पाच पोलीस उपनिरिक्षकांमध्ये राजेश खांडवे, ज्ञानेश्वर उदा, महारूद्र परजने, मिठू जगदाळे, बाळासाहेब शिंदे यांचा समावेश आहे. जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी हे आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस नक्षलवाद्यांविरूध्द लढा देत असतात. नक्षलवाद्यांविरोधात लढा देऊन नक्षल्यांना कंठस्नान घालत नक्षल चळवळीला हादरवून सोडणाºया अधिकारी व कर्मचाºयांचा शासनाने वेळोवेळी गौरव केला. अशाच नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात यशस्वी झालेल्या शूर पोलीस अधिकाºयांच्या कार्याचा सन्मान म्हणून बुधवारी पाच पोलीस अधिकाºयांना वेगवर्धित पदोन्नती देण्यात अआली. याप्रसंगी विशेष पोलीस महानिरिक्षक (नक्षल विरोधी अभियान) शरद शेलार, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक अंकूश शिंदे, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक ए. राजा, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी, महेंद्र पंडीत यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.नक्षल विरोधी अभियानाचा घेतला आढावानक्षल विरोधी अभियानाचे अप्पर पोलीस महासंचालक डी. कनकरत्नम यांनी गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येणाºया नक्षल विरोधी अभियानाचा आढावा यावेळी घेतला. तसेच विशेष अभियान पथकात कार्यरत असणाºया पोलीस जवानांच्या समस्या जाणून घेतल्या. पदोन्नती बहाल करण्यात आलेल्या पाच पोलीस अधिकाºयांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
पाच पीएसआयना वेगवर्धित पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:24 IST
अहेरी येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात बुधवारी अप्पर पोलीस महासंचालक (नक्षल विरोधी अभियान).....
पाच पीएसआयना वेगवर्धित पदोन्नती
ठळक मुद्देअहेरी प्राणहिता मुख्यालयात कार्यक्रम : अप्पर पोलीस महासंचालकांच्या हस्ते बहाल