शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

मत्स्यपालनातून साधली प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 05:00 IST

माधव निकुरे यांची गावालगत अडीच एकर शेती आहे. या शेतीत पूर्वी केवळ धानपीक घेतले जात होते. पाण्याअभावी बरेचदा धानपीक करपून जात होते. त्यामुळे शेतकरी निकुरे यांनी आपल्या शेतात बोअर खोदून सिंचन सुविधा निर्माण केली. त्यानंतर शेतात भाजीपाला पिकांची लागवड करून उत्पादन घेणे सुरू केले. वांगे, टमाटर, चवळीमाट, सांभार, मिरची, भेंडी आदी पीक यशस्वीरित्या घेत आहे.

ठळक मुद्देभाजीपाला लागवड । एकोडी गावातील शेतकरी घेतो लाखाचे उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी धान शेतीसोबतच भाजीपाला व मत्स्यपालनाकडे वळून प्रगती साधत असल्याचे दिसून येते. अशाच प्रकारची यशस्वी शेती एकोडी येथील शेतकरी माधव निकुरे हे करीत असून वर्षाला जवळपास सात लाखाचे उत्पन्न घेत आहे.माधव निकुरे यांची गावालगत अडीच एकर शेती आहे. या शेतीत पूर्वी केवळ धानपीक घेतले जात होते. पाण्याअभावी बरेचदा धानपीक करपून जात होते. त्यामुळे शेतकरी निकुरे यांनी आपल्या शेतात बोअर खोदून सिंचन सुविधा निर्माण केली. त्यानंतर शेतात भाजीपाला पिकांची लागवड करून उत्पादन घेणे सुरू केले. वांगे, टमाटर, चवळीमाट, सांभार, मिरची, भेंडी आदी पीक यशस्वीरित्या घेत आहे. शेतीतील उत्पादन वाढल्यानंतर सदर शेतकºयाने आपल्या शेतात दोन शेततळे स्वत:च्या पैशातून खोदले. मोटारपंपच्या सहाय्याने येथे पाणी करून त्यात मत्स्यबिज सोडले. येथील मत्स्यबिजला दररोज खाद्य पुरवठा करू लागले. अल्पावधीतच येथील मासे खाण्यायोग्य झाले. बाजारपेठेते नेऊन त्याची विक्री सुरू झाली. १२० रुपये किलो दराने शेततळ्यातील मासे विकून शेतकरी निकुरे यांनी उत्पन्न मिळविले. चामोर्शी तालुक्यात अशा प्रकारचे यशस्वीरित्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अल्पच आहे. परिस्थितीवर मात करून एकाच पिकावर अवलंबून न राहता, यशस्वी शेती करण्याचा संदेश निकुरे यांनी दिला आहे.कृषी अधिकाऱ्यांनी थोपटली पाठकेवळ अडीच एकर शेतीमध्ये भाजीपाला, मासे व धान आदींचे उत्पादन घेऊन शेतकरी निकुरे यांनी आपल्या गरीब परिस्थितीवर मात केली. तालुका कृषी अधिकाऱ्यांसह अनेक कर्मचाऱ्यांनी शेतीवर प्रत्यक्ष येऊन पाहिले. दरम्यान अनेकांनी शेतकरी निकुरे यांचे कौतुक केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती