लोकमत न्यूज नेटवर्कतुळशी : शेतीत नवनवीन तंत्राचा वापर करुन अधिक उत्पादन काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. भाजीपाला उत्पादकांसाठी टनेलमध्ये भाजीपाला रोपे तयार करणे या नावीन्यपूर्ण उपक्रमाची सुरूवात देसाईगंज तालुक्यातील पोटगाव व नैनपूर येथे करण्यात आली.१२ फूट रुंद व २० फूट लांब, ६ फूट उंच असा रोपासाठी डोम (टनेल) तयार करण्यात आला. यात भाजीपाला रोपे लागवडीकरिता तयार करुन विक्री करण्यात येत आहे. याकरिता आत्माचे बीटीएम महेंद्र दोनाडकर यांनी कमीत-कमी खर्चामध्ये शेडनेट तयार करण्याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. पोटगावचे प्रफुल्ल मेश्राम यांनी या प्रकल्पास सुरुवात केली असून त्यापासून रोजगार निर्मिती सुद्धा झाली आहे. याशिवाय देसाईगंजचे तालुका कृषी अधिकारी नीलेश गेडाम यांच्या मार्गदर्शनात कृषी पर्यवेक्षक युगेश रणदिवे, कृषी सहाय्यक कल्पना ठाकरे आदी कर्मचारी प्रात्यक्षिकासाठी सहकार्य करीत आहेत. विशेष म्हणजे, आत्माचे सेवानिवृत्त प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांचाही सल्ला घेतला जात आहे.तीन ते साडेतीन लाखात शेडनेट तयार कराण्यापेक्षा कमी खर्चाने हे टनेल तयार करुन आपल्या आवश्यकतेनुसार भाजीपाला रोपे तयार करावी. कमी खर्चाचे हे टनेल शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे.- महेंद्र दोनाडकर, बी.टी.एम., देसाईगंंंंज
टनेलमध्ये भाजीपाला रोपांची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 05:00 IST
१२ फूट रुंद व २० फूट लांब, ६ फूट उंच असा रोपासाठी डोम (टनेल) तयार करण्यात आला. यात भाजीपाला रोपे लागवडीकरिता तयार करुन विक्री करण्यात येत आहे. याकरिता आत्माचे बीटीएम महेंद्र दोनाडकर यांनी कमीत-कमी खर्चामध्ये शेडनेट तयार करण्याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. पोटगावचे प्रफुल्ल मेश्राम यांनी या प्रकल्पास सुरुवात केली असून त्यापासून रोजगार निर्मिती सुद्धा झाली आहे.
टनेलमध्ये भाजीपाला रोपांची निर्मिती
ठळक मुद्देखर्चात होणार बचत : पोटगाव व नैनपूर येथे प्रात्यक्षिक