शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

हेक्टरी ३३ क्विंटल धानाचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 23:11 IST

बागायत शेतीतील धानाची उत्पादकता हेक्टरी ३३.१२ क्विंटल तर जिरायती धानाची उत्पादकता हेक्टरी सरासरी २३.४९ किलो आढळून आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी धानाचे उत्पादन अधिक झाले असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचे प्रात्यक्षिक : मागील वर्षीच्या तुलनेत स्थिती चांगली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बागायत शेतीतील धानाची उत्पादकता हेक्टरी ३३.१२ क्विंटल तर जिरायती धानाची उत्पादकता हेक्टरी सरासरी २३.४९ किलो आढळून आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी धानाचे उत्पादन अधिक झाले असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे सव्वा लाख हेक्टरवर धान पिकाची लागवड केली जाते. जिल्ह्यात कन्नमवार जलाशय वगळता मोठा सिंचन प्रकल्प नाही. मात्र धानपिकाला अगदी सुरुवातीपासून सिंचनाची गरज राहत असल्याने गावपातळीवर मामा तलाव व बोड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. तलाव व बोड्यांच्या माध्यमातून सिंचन उपलब्ध करून दिले जाते. ज्या धानाला सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा धानाला बागायत क्षेत्रातील धान समजले जाते. सुरुवातीपासून सिंचन सुविधा उपलब्ध होत असल्याने सादर धानाचे पीक चांगले येते. त्यामुळे दर हेक्टरी उत्पादनही अधिक होते.बागायत क्षेत्रातील धानाच्या उत्पादनाची सरासरी काढण्यासाठी जिल्हाभरात १३० प्लॉट (१० मीटर चौरस धानाची जागा) टाकण्यात आले. या सर्व प्लॉटची सरासरी ३३.१२ क्विंटल येते.ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा धानाला जिरायती धान समजले जाते. असे शेतकरी कमी कालावधीत परिपक्व होणारे धान टाकतात. या धानाची उत्पादकता निश्चितच कमी राहते. यावर्षी जिरायती क्षेत्रातील धानाची सरासरी २३.४९ क्विंटल उत्पादन झाले आहे.मागील वर्षी जिल्हाभरात मावा व तुडतुडा रोगाने कहर केला होता. यावर्षी मात्र रोगाचे प्रमाण नगण्य होते. तसेच सुरुवातीपासून पाऊस झाला. त्यामुळे धानाच्या रोवणीची कामे वेळेत पार पडली. त्यामुळे धानाचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत अधिक झाले असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाºयांनी दिली आहे.कापसाला फटकाजिरायती क्षेत्रात कापूस पिकाचे उत्पादन घेतले जाते. प्रामुख्याने चामोर्शी, मुलचेरा, सिरोंचा आदी तालुक्यांमध्ये कापसाचे उत्पादन होते. यावर्षी शेवटच्या टप्प्यात पाऊस झाला नाही. याचा फटका कापूस पिकाला बसला आहे. मागील वर्षी शेवटच्या टप्प्यात पाऊस झाला होता. त्यामुळे पिकाला अधिकची बोंडे येऊन कापूस पिकाचे उत्पादन वाढले होते. यावर्षी मात्र कापूस पिकाच्या उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता आहे. काही शेतकºयांचा तर खर्चही भरून निघणे अशक्य झाले आहे.पावसाच्या उसंतीने पुन्हा धान मळणीला सुरूवातरविवारी व सोमवारी झालेल्या पावसामुळे धानाची मळणी थांबली होती. अनेक शेतकºयांनी धानाच्या गंजीवर ताडपत्री झाकून धानाचे संरक्षण केले. पावसाने उसंत घेतल्यानंतरही दोन दिवस धानाची गंजी वाळण्यासाठी शेतकºयांनी वेळ दिला. त्यानंतर आता मात्र पुन्हा मळणीला सुरुवात झाली आहे. परंतु आठवडाभरापूर्वी जड धानाची बांधणी करून धानाची गंजी तयार करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे गंजीतील धान भिजले आहे. त्यामुळे या शेतकºयांच्या धानाला कमी दर मिळण्याची भीती अनेक शेतकरी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती