शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शिक्षक समायोजनाची समस्या बनली जटिल

By admin | Updated: September 5, 2016 01:41 IST

राज्य शासनाने सन २०१५-१६ ची संचमान्यता करताना राज्यस्तरावर संच मान्यतेत प्रस्तावित पदांचा उल्लेख केलेला नाही.

प्रस्तावित पदे शासनाने दाखविलीच नाहीमालेवाडा : राज्य शासनाने सन २०१५-१६ ची संचमान्यता करताना राज्यस्तरावर संच मान्यतेत प्रस्तावित पदांचा उल्लेख केलेला नाही. ही पदे अडवून ठेवल्याने राज्यभरात शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न जटिल झाला आहे. शाळांमधून भरण्यात आलेल्या सरल माहितीच्या आधारावर २०१५-१६ च्या संच मान्यता देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या बरोबर दर्शविण्यात आली होती. मात्र वर्ग तेवढ्या वर्गखोल्या या निकषामध्ये वर्गखोल्याची संख्या कमी दाखविल्यामुळे मंजूर पदांची संख्या कमी करण्यात आली. राज्यस्तरावर रिक्त पदांचा व उपलब्ध शिक्षकांच्या संख्येचा ताळमेळ योग्य पध्दतीने बसत नाही. अनेक संस्थांनी त्यांच्याकडील सेवाज्येष्ठ शिक्षकांची माहिती पाठविताना सेवाज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय केल्याची ओरड होत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या समायोजनाचे वेळापत्रक कोलमडले आहे. समाज कल्याण, आदिवासी विकास विभागातर्फे अनुदान प्राप्त करणाऱ्या शाळांना काम नाही तर वेतन नाही, असे धोरण शासनाने अवलंबिले आहे. हाच नियम खासगी शिक्षण संस्थांच्या कर्मचाऱ्यांनाही पुढे लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिक्षक संवर्गाचे धाबे दणाणले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सहावा व आठवा वर्ग सुरू झाला आहे. कित्येक विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत प्रवेशीत होत आहेत. त्यामुळे शाळा ओस पडत चालले आहेत. तुकड्या बंद पडू लागल्या आहेत. परिणामी खासगी शिक्षण संस्थांचे शिक्षक अतिरिक्त होण्याचा आणखी मोठा धोका निर्माण झाला आहे. (वार्ताहर)