शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
5
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
6
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
7
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
8
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
9
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
10
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
11
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
12
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
13
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
14
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
15
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
16
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
17
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
18
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
19
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
20
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...

सर्वेक्षणातून जाणल्या कासवीच्या समस्या

By admin | Updated: December 23, 2015 02:00 IST

स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालयाच्या रासेयो विभागाच्या वतीने १९ व २० डिसेंबर रोजी विद्यार्थी व प्राध्यापकांनी ...

प्रत्येक कुटुंबाला भेट : महात्मा गांधी महाविद्यालयाच्या रासेयो विभागाचा उपक्रमआरमोरी : स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालयाच्या रासेयो विभागाच्या वतीने १९ व २० डिसेंबर रोजी विद्यार्थी व प्राध्यापकांनी सर्वेक्षण करून कासवी गावातील कुटुंबाच्या समस्या जाणून घेतल्या. ग्राम सर्वेक्षणांतर्गत १८० कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात कुटुंबाची वैयक्तिक माहिती आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य, धार्मिक, सामाजिक, सहकार, राजकारण व स्थलांतर विषयक माहिती गोळा करण्यात आली. या सर्वेक्षणात रासेयोच्या ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन कुटुंब प्रमुखांकडून माहिती भरून घेतली. सर्वेक्षणादरम्यान प्रत्येक कुटुंबाने रासेयो विद्यार्थ्याना सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. ग्राम सर्वेक्षणाच्या माध्यमातून सदर गावाचा आर्थिक स्तर जेमतेम असल्याचे दिसून आले. गावात आरोग्याच्या सोयी अल्प आहेत. गावातील धार्मिक वातावरण सलोख्याचे असल्याचेही नि:ष्पन्न झाले. सदर सर्वेक्षण प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. यासाठी रासेयो प्रमुख प्रा. ज्ञानेश्वर ठाकरे, डॉ. अमिता बन्नोरे, डॉ. विजय गोरडे, प्रा. गंगाधर जुआरे, प्रा. शशिकांत गेडाम, प्रा. मोहनलाल रामटेके, प्रा. डॉ. राजेंद्र घोनमोडे, प्रा. नोमेश मेश्राम, प्रा. मनोज ठवरे, प्रा. प्रमोद रामटेके, प्रा. कविता खोब्रागडे, प्रा. सुनंदा मडावी, विवेकानंद भाजीपाले, युगेश्वरी भोयर, याशिका चहांदे, मधुकर चापले, युक्ती जुआरे, आशन्ना कुरेशी यांनी सहकार्य केले. कासवीचे उपसरपंच प्रवीण रहाटे, ग्रामसेवक बी. टी. जौंजालकर, कृषीमित्र दीपक दुपारे, अजय गुरनुले, चंद्रकांत दोनाडकर, गुलाब भोयर, विश्वास कांदोर यांनीही सहकार्य केले. संस्थाध्यक्ष किशोर वनमाळी, कार्याध्यक्ष अब्दुलभाई पंजवानी यांनी या कार्याचे कौतुक केले. (वार्ताहर)