तालुका शिक्षक समितीच्यावतीने शुक्रवारी पंचायत समितीच्या सभागृहात संवर्ग विकास अधिकारी अनिता तेलंग यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. त्यांना विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांबाबत माहिती देण्यात आली. याप्रसंगी पंचायत समिती शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारीसुद्धा हजर होते. यावेळी ओबीसी व दारिद्रयरेषेखालील विद्यार्थांच्या गणवेश निधीबाबत तसेच शिक्षकांच्या रजेची प्रकरणे, त्यांची थकबाकी, देयके तात्काळ अदा करणे, आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांची वेतनवाढ, थकबाकी प्रकरणांसह शिक्षकांच्या वैयक्तिक समस्या आदींबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी गटशिक्षण अधिकारी रवींद्र शिवणकर, शिक्षण विस्तार अधिकारी टेंभूर्णे, कक्ष अधिकारी चौगुले, सहा लेखा अधिकारी महेश कोत्तावार, लिपिक अखिल श्रीरामवार, गणेश सुंकरवार, रेशम येरमे, वंदना ठाकरे तसेच शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष खिरेंद्र बांबोळे, सरचिटणीस केशव पर्वते, कार्याध्यक्ष प्यारेलाल दाउदसरीया, प्रवक्ता हेमंत मेश्राम, दिनू वघारे, अनिल उईके, महिला आघाडीप्रमुख वैशाली कोसे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बांडे, भगवान मडावी, गोविंद टेकाम, नरेश बंसोड, रायसिंग काटेंगे, गुलाब सोनकुकरा, संजय कोळवते, उमाजी गजभिए, केंद्रप्रमुख शालिक मेश्राम आदी उपस्थित होते.
विद्यार्थी व शिक्षकांचा समस्या अग्रक्रमाने मार्गी लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:32 IST