शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

३०-३५ प्रवाशांनी भरलेली खासगी ट्रॅव्हल्स उलटली; तीन गंभीर, १५ किरकोळ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2022 18:22 IST

कोटगूल-वडसा मार्गावरील अपघात

कोरची (गडचिरोली) : कोटगुलवरून-वडसाला भरगच्च प्रवासी घेऊन जाणारी खासगी बस चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याकडेला बांधीत जाऊन उलटली. या अपघातात ३ प्रवासी गंभीर तर १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ दरम्यान बेडगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत घडली.

माहितीनुसार, कोटगूलवरून आकाश ट्रॅव्हल्स ३५ ते ४० प्रवासी घेऊन वडसाकडे जात होती. दरम्यान, कोरचीपासून ३ किमीवर असलेल्या बेडगाव वळणावर वाहनाचे एक्सेल तुटल्याने चालक धर्मेंद्र नारद फुलारी यांचे बसवरून नियंत्रण सुटले आणि ट्रॅव्हल्स सरळ बांधीत जाऊन उलटली. 

या घटनेत दीपिका सोनू शिकारी (२५) रा. देवरी, ता.रतनपूर, जि बिलासपूर (छत्तीसगड), आम्रपाली गोकुळ जांभुळकर (३६) रा.चपराड, ता. लाखांदूर, जि.भंडारा, कोरची आश्रम शाळेतील कामाठी आनंदराव नारायण मरापे (५८) हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

तर, १५ किरकोळ जखमींमध्ये बोरी येथील पोस्टमास्टर निकिता टेंभुर्णे (२१), श्यामलाल रामजी पुरामे (६५) रा.सोनपूर, शांताबाई ठाकुराम मडावी (३५) रा. कोरची, ललिता नारायण पडोटी (४०) सोनपूर, कुमारी अरविंद गावळे (३०) नांदनी, रामदास पांडुरंग जांभुळकर (७०) रा. चपराड, अरमान सोनू शिकारी (२) रा. शिराजपूर, जयाबाई गणेश धुर्वे (६८) रा. कुरखेडा, रसिका रामदास जांभुळकर (६७) रा. चपराड, रामचंद्र दुनियाजी तांडेकर (७५) रा. बेडगाव, निकिता विशाल टेंभुर्णे (२१) वर्षे रा. बोरी, नीलम मनोज मडावी (२१) वर्ष रा.मोहगाव, रचना सोनू शिकारी (०७) रा. शिराजपुर, मनोज सुधाराम मडवी (२५) वर्ष रा. मोहगाव, नंदिनी सोनू शिकारी (३४) वर्ष रा. शिराजपुर, रंन्तु शिवकुमारी शिकारी (४०) वर्ष रा. शिराजपुर यांना कोरची ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे. 

अपघाताची माहिती मिळताच बेळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. व जखमी प्रवाशांना ट्रॅव्हलमधून बाहेर काढून कोरची ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. या प्रकरणी कोरची पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

एसटी बंद विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचे हाल

शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठी व मुलींसाठी मानव विकास योजनेअंतर्गत तालुक्याला जिल्हा अधिकारी यांनी ६ बसेसची सोय करून दिली आहे. पण गडचिरोली आगार व्यवस्थापकांनी शैक्षणिक सत्र अर्धे संपून गेले तरी एकही बस सुरू केली नाही. कोरची पंचायत समितीने यासाठी पुढाकार घेऊन बसेस सुरू करण्यासाठी ठराव पाठवले होते. परंतु, त्या ठरावाला आगार व्यवस्थापकांनी केराची टोपली दाखवली. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी ३-४ किमी अंतरावरून पायपीट करावी लागते.

एकेकाळी गडचिरोली व ब्रह्मपुरी आगाराला भरघोस उत्पन्न देणाऱ्या ब्रम्हपुरी आगारातील कोरची-नागपूर, ब्रम्हपुरी-कोरची-देवरी- गोंदिया तसेच गडचिरोली आगारच्या गडचिरोली-कोरची- बोरी, गडचिरोली-कोरची-कोडगुल या बसेस आगार व्यवस्थापकांनी बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मिळेल त्या वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे हे विशेष.

टॅग्स :AccidentअपघातGadchiroliगडचिरोली