शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:24 IST

विविध योजनांच्या माध्यमातून शेतकºयांचा विकास करण्याला शासन प्राधान्य देत आहे, असे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले. चामोर्शी येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तालुकास्तरीय महाराजस्व अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देआमदारांचे प्रतिपादन : चामोर्शी येथे महाराजस्व अभियान कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास करण्याला शासन प्राधान्य देत आहे, असे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले.चामोर्शी येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तालुकास्तरीय महाराजस्व अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, नायब तहसीलदार सुधाकर बावणे, तनगुलवार, जि. प. सदस्य रमेश बारसागडे, विद्या आभारे, सभापती आनंद भांडेकर, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, रमेश अधिकारी, माणिकराव तुरे, गुंडावार आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ. देवराव होळी म्हणाले, शासनाने ६ जून २०१८ ला शासन निर्णय काढला आहे. तालुक्यातील प्रत्येक शेतकºयांनी आपल्या वर्ग २ च्या जमिनी सहा महिन्याच्या आत वर्ग १ करून घ्यावे. त्याचबरोबर अतिक्रमणधारकांनी प्रॉपर्टी कार्ड भरून जमीन आपल्या नावे करावी. बंगाली बांधवांच्या जमिनीची मोजणी झाली असून त्यांना लवकरच प्रॉपर्टी कार्ड दिले जाईल, ३५ हजार कोटी रूपयांचे कर्ज शासनाने माफ केले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम अजून जमा झाली नाही त्यांना लवकरच कर्जमाफी देण्याच्या उद्देशाने प्रयत्न सुरू आहेत, शेतकरी व सामान्य नागरिक यांच्या हिताला राज्य व केंद्र शासन प्राधान्य देत आहे, असे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले.तालुका कृषी विभागाकडून चार लाभार्थ्यांना तुरीच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :Farmerशेतकरी