लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रासायनिक खतांच्या किमतीत यावर्षी शासनाने सुमारे २५ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन बिघडून तो आर्थिक अडचणित येण्याची शक्तता आहे.शेतात रासायनिक खताऐवजी शेणखत व सेंद्रीय खताचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फ त करण्यात येत असले तरी यांत्रिकीकरणामुळे पशुधन नष्ट होत चालले आहे. त्यामुळे रासायनिक खतांच्या वापराशिवाय पर्याय राहिलेला नाही. परिणामी शेतकरी अगदी सुरूवातीपासूनच शेतात रासायनिक खतांचा वापर करतात. शेतीच्या खर्चाच्या नियोजनात रासायनिक खते हा अविभाज्य घटक झाला आहे. मात्र खतांच्या किमती वाढल्या असल्याने शेतकऱ्यांचे नियोजनच बिघडले आहे. रासायनिक खतांच्या किमती दरवर्षी ५ ते १० टक्यांनी वाढत होत्या. यावर्षी मात्र सुमारे २० ते २५ टक्के एवढी वाढ केली आहे. शेतकऱ्यांकडे इतर खत उपलब्ध नसल्याने या खतांचा वापर करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. शासन एकीकडे शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करते तर दुसरीकडे शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या बांबीची किमंत वाढ करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. रासायनिक खते, यांत्रिकीकरण यामुळे शेतीच्या खर्चात वारेमाप वाढ झाली आहे. मात्र उत्पन्न वाढीवर मर्यादा आहेत. त्यामुळेच शेतकरी कर्जबाजारी होत आहे.
खतांच्या किमतीत २५ टक्यांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 21:57 IST
रासायनिक खतांच्या किमतीत यावर्षी शासनाने सुमारे २५ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन बिघडून तो आर्थिक अडचणित येण्याची शक्तता आहे. शेतात रासायनिक खताऐवजी शेणखत व सेंद्रीय खताचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फ त करण्यात येत असले तरी यांत्रिकीकरणामुळे पशुधन नष्ट होत चालले आहे.
खतांच्या किमतीत २५ टक्यांनी वाढ
ठळक मुद्देशेतकऱ्यांचे खरिपाचे नियोजन बिघडले : शेतीच्या खर्चात होताहे वाढ