शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी, चामोर्शी बसस्थानकाच्या जागेचा प्रस्ताव सादर

By admin | Updated: November 3, 2014 23:25 IST

चामोर्शी शहरात मोठी बाजारपेठ आहे. तसेच आष्टी हे गाव चंद्रपूर-अहेरी मार्गावर आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही ठिकाणच्या नव्या बसस्थानकाचा प्रश्न जागेअभावी रखडलेला होता.

चामोर्शी : चामोर्शी शहरात मोठी बाजारपेठ आहे. तसेच आष्टी हे गाव चंद्रपूर-अहेरी मार्गावर आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही ठिकाणच्या नव्या बसस्थानकाचा प्रश्न जागेअभावी रखडलेला होता. याची दखल घेत नवनिर्वाचीत आमदार डॉ. देवराव होळी यांनी राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी कुलकर्णी यांची भेट घेऊन सदर प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याबाबत चर्चा केली. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी कुलकर्णी यांनी बसस्थानक बांधकामासाठी लागणाऱ्या जागेची परवानगी त्वरित घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. चामोर्शी व आष्टी येथील बसस्थानकासाठी संपादित केलेल्या जागेसंदर्भात महसूल व वनविभागाचे प्रधानसचिव यांच्याकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले असल्याची माहिती आमदार डॉ. देवराव होळी यांना दिली. याप्रसंगी भाजपाचे गडचिरोली विधानसभा प्रमुख रविंद्र ओल्लालवार, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे उपस्थित होते. चामोर्शी व आष्टी या दोन्ही ठिकाणच्या नव्या बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (शहर प्रतिनिधी)