रवींद्र रमतकर यांचे आवाहन : केंद्र प्रमुखांची डायटमध्ये कार्यशाळा गडचिरोली : जिल्ह्यातील १०० टक्के विद्यार्थ्यांना डिसेंबरपूर्वी प्रगत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने व मुख्याध्यापकांनी वर्षभराचा अॅक्शन प्लॅन तयार केला पाहिजे व त्यानुसार कार्यवाही केली पाहिजे, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. रवींद्र रमतकर यांनी केले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत शुक्रवारी केंद्र प्रमुखांच्या चिंतन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. रमतकर बोलत होते. कार्यशाळेला जिल्हाभरातील ८० केंद्र प्रमुख उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून केंद्र प्रमुख गौतम प्रा. डॉ. धनंजय चापले, डॉ. विनीत मत्ते, डॉ. नरेश वैद्य, केंद्र प्रमुख गौतम मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेदरम्यान अवधारणा, माहिती, संकल्पना, कौशल्य, अभिवृत्ती, रचनावादी वर्गखोलीचे महत्त्व, बेसलाईन डेस्टचे आयोजन व्यवस्थित करणे, आधार कार्डची माहिती भरणे आदींविषयी सदर कार्यशाळेदरम्यान चर्चा करण्यात आली. निर्धारीत कालावधीत सर्व शाळा प्रगत करण्याचा संकल्प केंद्र प्रमुखांनी केला. (नगर प्रतिनिधी)
वर्षभराचा अॅक्शन प्लॅन तयार करा
By admin | Updated: July 24, 2016 01:40 IST