शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

कामासाठी गाव सोडण्याची तयारी ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 23:31 IST

राज्य व देशभरातील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहेत. रोजगार प्राप्त करण्यासाठी युवकांनी स्वत:चे गाव, जिल्हा ओलांडून जाण्याची मानसिकता तयार केली पाहिजे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी केले.

ठळक मुद्देनगराध्यक्षांचे प्रतिपादन : गडचिरोलीत रोजगार मेळावा; प्रधानमंत्री कौशल्य केंद्राचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य व देशभरातील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहेत. रोजगार प्राप्त करण्यासाठी युवकांनी स्वत:चे गाव, जिल्हा ओलांडून जाण्याची मानसिकता तयार केली पाहिजे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी केले.येथील इंदिरा गांधी चौकातील प्रधानमंत्री कुशल केंद्रात रोजगार मेळाव्याचे आयोजन गुरूवारी केले होते. याप्रसंगी त्या मार्गदर्शन करीत होत्या. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, नीलेश खांडेकर, महेश जेंगठे, समीर पाठ, नितीन तारनेकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.पुढे बोलताना नगराध्यक्ष म्हणाल्या, स्वत:ला काय बनायचे आहे, हे ध्येय निश्चित करून त्यानुसार जीवनात मार्गक्रमण करावे. निश्चित केलेल्या मार्गावरून मार्गक्रमण करताना कितीही संकट आले तरी त्यावर मात करून पुढे जाण्याची तयारी ठेवावी. स्किल इंडिया कार्यक्रमांतर्गत युवकांना विविध प्रकारचे रोजगाराचे प्रशिक्षण दिले जात आहे. कंपन्यांमध्ये अगदी सुरुवातीला कमी वेतन दिले जाते. परंतू सुरुवातीला कितीही वेतनावर काम करण्याची तयारी ठेवून त्याच ठिकाणी स्वत:चे कौशल्य विकसित करावे, असे नगराध्यक्ष म्हणाल्या.जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी मार्गदर्शन करताना, सरकारी नोकरी मिळाली नाही तरी स्वत:चा उद्योग सुरू करून तो वाढविण्याची ताकद युवकांनी ठेवली पाहिजे. बेरोजगारी कमी करणे, हे पंतप्रधानांचे मुख्य ध्येय आहे. त्यामुळे प्रशिक्षण देण्यावर केंद्र शासन विशेष लक्ष देत आहे. प्रशिक्षणाचा उपयोग स्वत:चा उद्योग थाटण्यासाठी किंवा नोकरी मिळविण्यासाठी करावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमादरम्यान प्रशिक्षण घेतलेल्या युवकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.७०० युवकांना व्यवसायाचे मिळाले प्रशिक्षणस्किल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत गडचिरोली शहरात प्रधानमंत्री कौशल्य केंद्र चालविले जात आहे. या केंद्राअंतर्गत फूड अ‍ॅण्ड बेवरेज, वेअर हाऊस पॅकर्स, सीसीटीव्ही इन्स्टालेशन अ‍ॅण्ड टेक्निशियन, कम्पुटींग अ‍ॅण्ड पेरफेरल्स फिल्ड टेक्निशियन, इलेक्ट्रिशियन या पाच प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणार्थ्यांना संगणक, व्यक्तीमत्त्व विकास तसेच स्पोकन इंग्लिशचेही प्रशिक्षण दिले जाते. आजपर्यंत ७०० युवकांना प्रशिक्षण दिले असून ३४० युवकांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्ष