शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

मतमोजणीची तयारी पूर्ण

By admin | Updated: October 18, 2014 01:28 IST

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली, अहेरी या तीन विधानसभा मतदार संघात मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली असून..

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली, अहेरी या तीन विधानसभा मतदार संघात मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली असून १९ आॅक्टोबरला सकाळी ८ वाजतापासून देसाईगंज, गडचिरोली व आलापल्ली स्थित नागेपल्ली येथे शासकीय मतमोजणी केंद्रावर मतमोजणी होणार आहे. या सर्व मतमोजणी केंद्रावरची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. नक्षलग्रस्त जिल्हा असल्यामुळे मतमोजणीच्या दिवशीही प्रचंड सुरक्षा व्यवस्था राहणार आहे.६८ गडचिरोली विधानसभा क्षेत्रात मतमोजणीची व्यवस्था गडचिरोली येथील चंद्रपूर मार्गावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात करण्यात आली आहे. या मतमोजणीसाठी जवळपास ४० कर्मचारी लागणार असून मतमोजणीसंदर्भातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. मतमोजणीस्थळी १४ टेबल राहणार असून पोस्टल मतमोजणीसाठी स्वतंत्र टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. या मतमोजणीदरम्यान साधारणत: १३ फेरी होतील, अशी माहिती प्रशासकीय सुत्रांकडून मिळाली आहे. सकाळी ८ वाजतापासून त मतमोजणी संपेपर्यंत साधारणत: २ ते ३ वाजेपर्यंत निकाल येईल, अशी अपेक्षा आहे. राजकीय पक्षाचे विधानसभा निवडणुकीतील उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना १९ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता मतमोजणीस्थळी बोलाविण्यात आले आहे. या ठिकाणी फेरीनिहाय मतमोजणीची माहिती नागरिकांना देण्यासाठी ध्वनीक्षेपकाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पत्रकारांसाठी स्वतंत्र मीडिया कक्ष निर्माण केले जाणार आहे.६९ अहेरी विधानसभा क्षेत्राची मतमोजणी नागेपल्लीस्थित आलापल्ली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात होणार आहे. १४ टेबलवर २० फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी केली जाणार असून प्रत्येक टेबलसाठी दोन महत्वाचे कर्मचारी, अधिकारी असे २८ जण नियुक्त करण्यात आले आहे. याशिवाय ५० कर्मचारी या मतमोजणी कामात सहभागी असतील. अहेरी उपविभागातील ५ तालुक्याचे तहसीलदार व नायब तहसीलदार मतमोजणीच्या कामावर देखरेख ठेवणार आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर दुपारी २ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल घोषित होईल, अशी अपेक्षा आहे.आरमोरी विधानसभा क्षेत्रातील मतमोजणी उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्या परिसरात देसाईगंज येथे राहणार आहे. या कामासाठी १४ पर्यवेक्षक, १४ सहाय्यक, ४ राखीव कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. स्ट्राँगरूमची सुरक्षा व्यवस्था गडचिरोली पोलीस दल व राज्य राखीव पोलीस दल हे पाहत आहेत. एका राऊंडला किमान पाऊन ते एक तासाचा कालावधी लागेल, अशी अपेक्षा आहे.