शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

मान्सूनपूर्व शेती कामाची लगबग वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:00 IST

शेतातील केरकचरा, मातीकाम, वखरणी आदी कामे शेतकरी सध्या करीत आहेत. पावसाचे रोहणी नक्षत्राचे पहिले चरण सुरू आहे. रोहिणीच्या पावसानंतर शेतजमिनीत ओलावा आल्यावर शेतकरी धानाचे पºहे टाकत असतात. शेतकऱ्यांना गतवर्षी पावसाच्या हुलकावणीला तोंड द्यावे लागले.

ठळक मुद्देशेतकरी बांधावर : वाढत्या तापमानामुळे सकाळीच कामे करण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : मे महिना संपून जून महिना सुरू झाला आहे. जून महिन्यापासूनच पाऊस बरसत असल्याने चामोर्शी तालुक्याच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व शेतातील कामे आटोपण्यावर भर दिला आहे. वाढत्या तापमानामुळे सकाळच्या सुमारास शेतातील विविध कामे करण्यावर शेतकरी भर देत आहेत.शेतातील केरकचरा, मातीकाम, वखरणी आदी कामे शेतकरी सध्या करीत आहेत. पावसाचे रोहणी नक्षत्राचे पहिले चरण सुरू आहे. रोहिणीच्या पावसानंतर शेतजमिनीत ओलावा आल्यावर शेतकरी धानाचे पºहे टाकत असतात. शेतकऱ्यांना गतवर्षी पावसाच्या हुलकावणीला तोंड द्यावे लागले. परिस्थितीवर मात करत तालुक्यातील शेतकरी यंदाच्या खरीप हंगामात धान पिकाची लागवड करण्यासाठी तेवढ्याच उमेदीने तयारी करीत आहेत. कोरोना महामारीमुळे शेतजमिनी वगळता इतरत्र कामे नाही. त्यामुळे यंदा बहुतांश शेतकरी मान्सूनपूर्व शेती मशागतीच्या कामात स्वत:ला व्यस्त ठेवत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी गतवर्षीपेक्षा यंदाच्या खरीप हंगामात मान्सूनपूर्व शेतातील कामे लवकरच अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. शेतकºयांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून येत्या दोन-तीन दिवसांत तालुक्यासह जिल्ह्यात पाऊस झाल्यास बरेच शेतकरी जूनच्या पहिल्या व दुसºया आठवड्यात धानाचे पºहे टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही.कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामातील धान व इतर पिकांच्या लागवडीबाबत मार्गदर्शन केले जात आहे. तालुक्यातील कृषी केंद्रात खते, बियाणे, कीटकनाशके आदी कृषी निविष्ठा उपलब्ध करण्यात आले आहेत.

टॅग्स :agricultureशेती