शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांकडून तारण योजनेचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 01:18 IST

कृउबासने राबविलेली तारण योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची योजना असून या योजनेला शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन राज्याचे सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देसहकारमंत्र्यांची कार्यकर्त्यांशी चर्चा : पोरेड्डीवारांची नाळ सामान्यांशी जुळलेली

ऑनलाईन लोकमतआरमोरी : कृउबासने राबविलेली तारण योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची योजना असून या योजनेला शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन राज्याचे सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.आरमोरी येथे प्रकाश पोरेड्डीवार यांच्या निवासस्थानी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. कृष्णा गजबे, अरविंद पोरेड्डीवार, नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, संतोष पाटील, जि.प. सदस्य भाग्यवान टेकाम, संपत आळे, खेमनाथ डोंगरवार, डॉ. दुर्वेश भोयर, जागोबा खेडेकर, कृउबास सभापती खिरसागर नाकाडे, उपसभापती ईश्वर पासेवार, संचालक पप्पूजी नागदेवे, व्यंकटी नागिलवार, मुकेश वाघाडे, चांगदेव फाये, मनोज मने, दीपक निंबेकार, नगरसेवक अ‍ॅड. वालदे, हरीदर पंजवानी, काशिराम शेबे, पंकज खरवडे, नंदू नाकतोडे आदी उपस्थित होते.पुढे बोलताना ना. देशमुख म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात सहकारी चळवळ रूजविण्याचे काम पोरेड्डीवार यांनी केले आहे. पोरेड्डीवार यांची नाळ सर्वसामान्य कार्यकर्त्याशी जुळली आहे. सहकार क्षेत्रात काम करताना सामान्य माणसाला सक्षम करण्यासाठी सदैव तत्पर असावे लागते, हे काम अरविंद पोरेड्डीवार यांनी केले आहे, असे गौरवोद्गार देशमुख यांनी काढले. आ. कृष्णा गजबे यांनी मार्गदर्शन करताना माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला घडविण्यात पोरेड्डीवारांचा मोठा वाटा आहे. सत्ता येईल, जाईल परंतु चांगल्या विचारांच्या माणसासोबत आयुष्यभर राहण्याची साधना मला पोरेड्डीवार परिवाराकडून मिळाली आहे. त्यांच्याच मार्गदर्शनात आपण आरमोरी विधानसभेचे नेतृत्व करीत आहे, असे मार्गदर्शन केले.अरविंद पोरेड्डीवार यांनी मार्गदर्शन करताना सोलापूरसारख्या बलाढ्य जिल्ह्यात विविध सहकारी संस्था काढून सहकाराच्या माध्यमातून देशमुख यांनी कार्यकर्त्यांना चालना देऊन ते मंत्रीपदावर विराजमान झाले असल्याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार श्रीहरी कोपुलवार यांनी केले.आरमोरी कृउबासच्या कार्याची केली प्रशंसाना. सुभाष देशमुख यांनी आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन शेतमाल तारण योजनेअंतर्गत गोदामात ठेवण्यात आलेल्या शेतमालाची पाहणी केली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाºया विविध योजनांचा आढावा घेतला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या योजनांची प्रशंसा केली.आरमोरी येथे कोसा निर्मितीचे केंद्र आहे. या केंद्राला ना. देशमुख यांनी भेट दिली. यावेळी अरविंद पोरेड्डीवार यांनी कोसाचे कॅपड व कोसाचे पॅन्टपिस देशमुख यांना आरमोरीची आठवण म्हणून भेट दिली. यावेळी देशमुख यांनी कोसा उत्पादनाला चालना देण्यासाठी कोसा सहकारी संस्था स्थापन करण्यावर शासन सकारात्मक विचार करीत असून हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असे आश्वासन दिले.