लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी : जळगाव जिल्हातील चाळीसगाव पंचायत समिती येथून प्रफुल्ल नेत्रश्वर म्हैसकर हे अहेरी येथे संवर्ग विकास अधिकारी म्हणून बुधवारी रूजू झाले. ३१ मे २०१७ ला सुभाष चांदेकर हे नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त जागी प्रफुल्ल म्हैसकर हे रूजू झालेत. नवनियुक्ती बीडीओ म्हैसकर प्रभार स्वीकारताना सेवानिवृत्त संवर्गविकास अधिकारी सुभाष चांदेकर, गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य, कक्ष अधिकारी ए. व्ही. बावणे, लेखापाल राजू गुप्ता, आर. एम. बोरकर, तेजू दुर्गे, डी. जी. तिबोडे, पंचायत विस्तार अधिकारी के. व्ही रामटेके, गोविंद तरडे, पंकज अलोने, राजेश नगराडे, के. आर. पांडे, कृषी अधिकारी एम. डी सोनटक्के, आशिष कोतकोंडावार, महेंद्र कोठारे व पंचायत समिती कार्यालयीन कर्मचारी उपस्थितीत होते.
अहेरीच्या बीडीओपदी प्रफुल्ल म्हैसकर रूजू
By admin | Updated: June 17, 2017 01:59 IST