शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पं.स. पोटनिवडणुकीत ७१.५६ टक्के मतदान

By admin | Updated: April 18, 2016 03:50 IST

गडचिरोली तालुक्यातील जेप्रा व धानोरा तालुक्यातील धानोरा पंचायत समिती गणात रविवारी पोटनिवडणुकीसाठी

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील जेप्रा व धानोरा तालुक्यातील धानोरा पंचायत समिती गणात रविवारी पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. येथे या दोन्ही ठिकाणी मिळून सरासरी ७१.५६ टक्के मतदान झाले आहे. गडचिरोली पंचायत समितीच्या जेप्रा गणासाठी १७ एप्रिल रोजी रविवारला निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सकाळी ७.३० पासून तर सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत एकूण ४८.३२ टक्के मतदान झाले. जेप्रा पं.स. गणामध्ये जेप्रा, राजगाटा (माल), खुर्सा, बामणी, बामणी, सावरगाव, बोदली, बोदली, असे एकूण आठ मतदान केंद्र होते. सदर आठही मतदान केंद्र मिळून एकूण ५ हजार ९९३ मतदार होते. यामध्ये महिला २ हजार ९२० व पुरूष ३ हजार ७३ मतदारांचा समावेश होता. सकाळी ७.३० वाजतापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत या आठही मतदान केंद्रावर सरासरी एकूण ४८.३२ टक्के मतदान झाले. जेप्रा मतदान केंद्रावर ४७.३५, राजगाटा माल केंद्रावर ४८.४६, खुर्सा ५६.४०, बामणी ४६.२९, बामणी २१.५७, सावरगाव ६५.४, बोदली ५०.४४ व बोदली येथील दुसऱ्या केंद्रावर ४०.७३ टक्के मतदान झाले. जेप्रा पं.स. गणासाठी काँग्रेसतर्फे अमिता मडावी, भाजपातर्फे नंदा सलामे व शिवसेनेतर्फे पुस्तकला सिडाम हे तीन उमेदवार रिंगणात होते. या तीन उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले. धानोरा तालुक्यातील धानोरा-मुस्का पंचायत समिती गणाच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत एकूण सरासरी ६९.५६ टक्के मतदान झाले. या पं.स. गणाच्या निवडणुकीसाठी एकूण पाच मतदान केंद्र होते. यामध्ये सोडे, हेटी, येरकड, सालेभट्टी, सालेभट्टी आदींचा समावेश आहे. या पाचही केंद्रात मिळून एकूण मतदार संख्या ३ हजार २४२ आहे. यापैकी महिला १ हजार १०७ व पुरूष १ हजार ११८ अशा एकूण २ हजार २२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. सोडे मतदान केंद्रावर महिला १७१, पुरूष १५८ अशा एकूण ३२९ मतदारांनी मतदान केले असून याची टक्केवारी ७३.२७ आहे. हेटी केंद्रावर महिला २१४ व पुरूष २१६ अशा एकूण ४३० मतदारांनी मतदान केले असून याची टक्केवारी ६९.३५ आहे. येरकड केंद्रावर महिला ३०३ व पुरूष ३२० अशा एकूण ६२३ मतदारांनी मतदान केले असून याची टक्केवारी ६३.६३ आहे. सालेभट्टी येथील पहिल्या केंद्रावर महिला ६६ व पुरूष ७४ अशा एकूण १४० मतदारांनी मतदान केले असून याची टक्केवारी ७१.०५ आहे. सालेभट्टीच्या दुसऱ्या केंद्रावर महिला ३५३ व पुरूष ३५० अशा एकूण ७०३ मतदारांनी मतदान केले असून याची टक्केवारी ७०.५१ आहे. धानोरा-मुस्का पं.स. गणाच्या निवडणुकीसाठी भाजपातर्फे सुशिला सुखदेव टेकाम, काँग्रेसतर्फे ममिता अवसू किरंगे व शिवसेनेतर्फे कल्पना अवसू होळी हे तीन उमेदवार रिंगणात होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)घोट ग्रामपंचायतीत ७७.६४ टक्के मतदान ४चामोर्शी तालुक्यातील घोट येथील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण सरासरी ७७.६४ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत एकूण पाच वार्डातील पाच मतदान केंद्र होते. वार्ड क्रमांक एकच्या मतदान केंद्रावर पुरूष ३१२, स्त्रीया ३०१ अशा एकूण ६१३ मतदारांनी मतदान केले असून याची टक्केवारी ७०.५४ आहे. वार्ड क्रमांक दोनच्या केंद्रावर पुरूष २७६, स्त्रीया २४३, अशा एकूण ५१९ मतदारांनी मतदान केले असून याची टक्केवारी ७५.८७ आहे. वार्ड क्रमांक तीनच्या केंद्रावर पुरूष ३५६, स्त्रीया ३१२ अशा एकूण ६६८ जणांनी मतदानाचा हक्क बजाविला असून मतदानाची टक्केवारी ८२.४६ आहे. वार्ड क्रमांक चारच्या केंद्रावर पुरूष २८९, स्त्रीया ३४६ अशा एकूण ६३५ मतदारांनी मतदान केले असून याची टक्केवारी ७१.२७ आहे. वार्ड क्रमांक पाचच्या केंद्रावर पुरूष ४३३, स्त्रिया ४३८ अशा एकूण ८७१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला असून या केंद्रावरील मतदानाची एकूण टक्केवारी ८६.७५ आहे.उमेदवाराला पोलिसांची धक्काबुक्की४घोट ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान प्रक्रिया सुरू असताना निकतवाडा येथील प्रभाग क्रमांक पाचच्या केंद्रावर माजी ग्रा. पं. सदस्य तथा निवडणुकीतील उमेदवार पुरूषोत्तम अर्कपटलावार यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली. यामुळे या केंद्रावर काही वेळ तणाव निर्माण झाला होता.पारडी कुपी ग्रामपंचायतीत ९०.२ टक्के मतदानगडचिरोली तालुक्यातील पारडी कुपी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत रविवारी सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण सरासरी ९०.२ टक्के मतदान झाले. या निवडणुकीसाठी तीन प्रभागात तीन मतदान केंद्र होते. या निवडणुकीसाठी पुरूष ८६७ व महिला ८१२ असे एकूण १ हजार ७९ मतदार होते. यापैकी पुरूष ७९३ व महिला ७२१ अशा एकूण १ हजार ५१४ मतदारांनी मतदान केले. प्रभाग क्रमांक एकमध्ये एकूण ८९.८ टक्के, प्रभाग क्रमांक दोनमध्ये ९१.५ टक्के तर प्रभाग क्रमांक तीन मध्ये ८९.१ टक्के मतदान झाले. या ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण १८ उमेदवार रिंगणात होते.वायगाव ग्रा. प. पोटनिवडणुकीत ६६.९६ टक्के मतदान ४चामोर्शी तालुक्यातील वायगाव ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया घेण्यात आली. या निवडणुकीत एकूण ६६.९६ टक्के मतदान झाले.