शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

हरणघाट रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य, वाहनधारक त्रस्त; अपघाताला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 18:26 IST

हरणघाट-चामोर्शी या १४ कि.मी. लांबीच्या रस्त्यावर जागोजागी मोठंमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, या मागणीकडे सर्रास दुर्लक्ष झाले असून खड्ड्यांमुळे या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.

गडचिरोली : भेंडाळा तालुक्यातील हरणघाट -चामोर्शी या १४ कि.मी.लांबीच्या रस्त्यावर दोन ते तीन किमी परिसरात ठिकठिकाणी पडलेल्या जीवघेण्या खड्डयांमुळे वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून वाहन चालवण्याची वेळ आली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, या मागणीकडे सर्रास दुर्लक्ष झाले असून खड्ड्यांमुळे या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. यासाठी हा राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्गात परिवर्तित करावा, अशी मागणी केंद्रीय रस्ते विकास व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे नागरिक व वाहनधारकांकडून केली जात आहे.

हरणघाट-चामोर्शी या १४ कि.मी. लांबीच्या रस्त्यावर हरणघाट ते दोटकुली नाल्यापर्यंत व दाेटकुली ते भेंडाळा वीज पाॅवर स्टेशनपर्यंत, तर डांबर प्लांट ते दहेगावपर्यंत जागोजागी मोठंमोठे खड्डे पडले असून दहेगाव अंगणवाडीसमोर दोन मोठे खड्डे पडले. या खड्डयातून वाट कशी काढावी, या विवंचनेत वाहनधारक आहेत. चामोर्शी ते डांबर प्लांटपर्यंत वाहन कसे चालवावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चामोर्शी तालुका हा तीर्थक्षेत्राचा व तांदूळ तसेच कापूस उत्पादक म्हणून विदर्भात ओळख असलेला तालुका आहे. या तालुक्याच्या विकासासाठी चामोर्शी हरणघाट मूल हा ३७८ क्रमांकाचा राज्यमार्ग या महामार्गात परावर्तित करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

चामोर्शी-चाकलपेठ मार्गाला वाहनधारकांकडून पसंती

चामोर्शी या तालुक्याच्या ठिकाणाहून मूलकडे जाणारी वाहने मुरखळा क्रॉसवरून चाकलपेठ गावातून जात आहेत. त्यामुळे चाकलपेठ गावातील रस्त्याची जडवाहनामुळे वाताहात झाली आहे. नादुरुस्त रस्त्यामुळे वाहनधारकांना ५ किमी अंतर वळसा घालून मुख्य मार्गावर यावे लागत असल्याने वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. दहेगावजवळ मुख्य मार्गावर खड्ड्याचे साम्राज्य आहे. मात्र, लोकप्रतिनिधी व प्रशासनाने साधी मलमपट्टी केली नसल्याने रस्त्याचे दुखणे आणखी वाढत चालले आहे.

टॅग्स :Potholeखड्डेroad transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा