महसूल मंत्र्यांचे आदेश : लोकप्रतिनिधींनी घेतली होती भेटधानोरा : तालुक्यातील कोतवाल भरतीत घोळ करण्यात आल्याच्या तक्रारीवरून राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आॅक्टोबर २0१५ रोजी झालेल्या कोतवाल भरतीला स्थगिती दिली आहे. धानोरा येथील कोतवाल भरतीमध्ये तहसीलदार दिलीप फुलसंगे यांनी गैरव्यवहार केल्याच्या तक्रारी खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी यांच्याकडे प्राप्त झाल्या. या तक्रारीच्या अनुषंगाने महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेऊन कोतवाल भरतीला स्थगिती देऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी खा. नेते व आ. होळी यांनी केली. या तक्रारीची दखल घेऊन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विभागाच्या उपसचिवांना तात्काळ स्थगितीचे आदेश देवून अहवाल मागीतल्याची माहिती आ. डॉ. होळी यांच्या वतीने देण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)
धानोरातील कोतवाल भरती स्थगित
By admin | Updated: November 20, 2015 01:58 IST