शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

नदी किनारा नष्ट होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 01:22 IST

वैरागड-मानापूर मार्गावरील जुन्या कमी उंचीच्या पुलामुळे पावसाळ्यात वाहतुकीचा होणारा खोळंबा लक्षात घेऊन जुन्या पुलाच्या बाजूला मोठ्या पुलाचे काम करण्यात आले. या ठिकाणी दोन्ही पुलाच्या मधला नदी किनारा खोदण्यात आला.

ठळक मुद्देसंरक्षण भिंतीचा अभाव : सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदाराचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वैरागड-मानापूर मार्गावरील जुन्या कमी उंचीच्या पुलामुळे पावसाळ्यात वाहतुकीचा होणारा खोळंबा लक्षात घेऊन जुन्या पुलाच्या बाजूला मोठ्या पुलाचे काम करण्यात आले. या ठिकाणी दोन्ही पुलाच्या मधला नदी किनारा खोदण्यात आला. या खोदलेल्या भागाची सुरक्षा म्हणून बांधण्यात आलेली संरक्षण भिंत लहान असल्याने पावसाळ्यात पुरामुळे नदी किनारा वाहून जाण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.नवीन पुलापासून ते मोठ्या डांबरी रस्ता ते कढोली टी-पार्इंटपर्यंत जो रस्ता बनविण्यात आला आणि रस्त्याच्या बाजू बुजविण्यासाठी जुन्याच पुलाचा दगड वापरण्यात आला. सध्या ठिकाणी पुलाचे काम झाले त्याच्या बाजूला अंदाजे १०० ट्रॅक्टर ट्रॉली रेतीचे अवैध खनन करून येथील रेतीची बाहेर ठिकाणी वाहतूक करण्यात आली. हा सर्व प्रकार संबंधित कंत्राटदाराच्या सांगण्यावरून झाला असावा, असा नागरिकांचा आरोप आहे. जुना कमी उंचीचा पूल व नवीन पुलामधील नदी किनारा खोदण्यात आला. मात्र या किनाऱ्याच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या संरक्षण भिंती लहान आहेत. पावसाळ्यात पुरामुळे या नदी किनाºयाचे नुकसान होऊ नये यासाठी मोठ्या संरक्षण भिंती उभारण्यात याव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.सदर प्रकाराबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोका चौकशी करण्याची गरज आहे. त्यानंतर सत्य उघडकीस येईल. गावातील अनेक लोकांनी हा प्रकार जवळून पाहिला आहे. मात्र आत्तापर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घेतली नाही. कारवाई होते काय, याकडे जनतेचे लक्ष आहे.