गोपाल लाजुरकर - गडचिरोलीराज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या मागील दहा वर्षात १ लाख २ हजार ६१० ने वाढली़ पण, लोकसंख्या वाढीच्या वेगाने जिल्ह्याच्या विकासाचा वेग वाढला नाही़ त्यामुळे २०११ च्या जनगणनेत तब्बल १० लाख ७२ हजार ९०४ लोकसंख्येचा हा जिल्हा विकासाच्या क्षेत्रात अद्यापही पिछाडीवरच आहे़२००१ च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या ९ लाख ७० हजार २९४ होती़ यात ४ लाख ९१ हजार १०१ पुरूष व ४ लाख ७९ हजार १९३ महिलांचा समावेश होता़ जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या आजही ग्रामीण भागातच आहे़ २००१ मध्ये ग्रामीण भागाची लोकसंख्या ९ लाख ३ हजार ३३ होती़ यात ४ लाख ५६ हजार ६४७ पुरूष व ४ लाख ४६ हजार ३८६ महिलांचा समावेश होता़ शहरी भागात ६७ हजार २६१ लोकसंख्या होती़ या शहरी लोकसंख्येत ३४ हजार ४५४ पुरूष व ३२ हजार ८०७ महिला होत्या़ २०११ च्या जनगणनेत ग्रामीण व शहरी भागातील लोकसंख्येत बरीच वाढ झाली आहे़ नव्या जनगणनेनुसार ग्रामीण भागाची लोकसंख्या ९ लाख ५३ हजार ८५८ आहे़ यात पुरूष ४ लाख ८२ हजार ७४० आणि महिला ४ लाख ७१ हजार २२७ महिला आहेत़ शहरी भागाचीही लोकसंख्या वाढली आहे. शहरी भागात १ लाख १८ हजार ९३७ लोकांची नोंद झाली आहे़ यात ६० हजार ७३ पुरूष व ५७ हजार ८६४ महिलांचा समावेश आहे़
लोकसंख्या वाढली; विकासात मागेच
By admin | Updated: July 10, 2014 23:35 IST