शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

पैशाच्या भाराने गरीब गॅस ग्राहक अडचणीत

By admin | Updated: January 7, 2015 22:51 IST

गतवर्षी यूपीए सरकारने गडचिरोली जिल्ह्यात गॅस सिलिंडरवर थेट अनुदान योजना सुरू केली होती. या योजनेत गॅस सिलिंडर खरेदीसाठी ग्राहकाला आधी आपल्याजवळचे पैसे द्यावे लागत होते.

गडचिरोली : गतवर्षी यूपीए सरकारने गडचिरोली जिल्ह्यात गॅस सिलिंडरवर थेट अनुदान योजना सुरू केली होती. या योजनेत गॅस सिलिंडर खरेदीसाठी ग्राहकाला आधी आपल्याजवळचे पैसे द्यावे लागत होते. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यावर सबसिडीची रक्कम जमा होत होती. या योजनेत सिलिंडर १२०० ते १४०० रूपये किंमतीचे होते. त्यामुळे निममध्यमवर्गीय व गरीब नागरिकांना सिलिंडर खरेदीसाठी प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असे. आता पुन्हा हीच परिस्थिती गरीब गॅस ग्राहकाची चिंता वाढविण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. यूपीएच्या काळात सबसिडी योजना सुरू झाल्यावर गॅस सिलिंडर घेण्यासाठी काहींना इतरांकडून रक्कम गोळा करून सिलिंडरसाठी आर्थिक सोय करून ठेवावी लागत होती. त्यामुळे गरीब कुटुंबांनी या काळात सिलिंडरची उचलही केली नाही. आता केंद्र सरकारने पुन्हा १ जानेवारी २०१५ रोजीपासून गडचिरोली जिल्ह्यात गॅस सिलिंडरवर थेट सबसिडी योजना लागू केली आहे. त्यामुळे पुन्हा मध्यमवर्गीय गॅस ग्राहक धास्तावलेला आहे. अनुदानित सिलिंडरसाठी ७८९ रूपये दर राहणार आहेत. अनेक गरीब कुटुंबांना सिलिंडरसाठी ७८९ रूपयांची रक्कम जुळवून ठेवणे अवघड जाणार आहे. आजकाल गॅस सिलिंडर हे हमाली व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांपासून ते घरकाम करणाऱ्या महिलांसह झोपडपट्टी भागातील नागरिकांकडेही आहे. अशा नागरिकांना सिलिंडरसाठी ४६० रूपये जमा करणे सहज शक्य होत होते. परंतु आता यामध्ये खिशातील पैसे अडकून पडतात. अशावेळी अनेक गॅस ग्राहकाला अडचणीत इतरांकडून रक्कम घेऊन सिलिंडर घेण्याची सोय करावी लागणार आहे.यूपीए सरकारच्या काळात थेट अनुदान योजनेतून या अडचणी समोर आल्या होत्या. गॅसच्या किंमतीही एकाच जिल्ह्यात विविध तालुक्यात वेगवेगळ्या राहण्याचाही प्रकार घडला होता. त्यामुळे पुन्हा ही योजना लागू झाल्याने गरीब गॅस ग्राहक चिंतेत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)