संपूर्ण रस्त्याची चाळण तयार झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे तर आहेतच साेबतच डागडुजीच्या वेळेस टाकलेली माती रस्त्यावर निघाली आहे. वाहनाला अपघात होण्याचीही शक्यता बळावली आहे. धुळीमुळे अनेकांना श्वसनाचा त्रास सुध्दा निर्माण झाला आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीमध्ये कोरोनाच्या अनेक लक्षणांपैकी श्वसनाचा त्रास हे एक लक्षण असल्यामुळे अनेक वाहनधारकांना भीती वाटायला लागली आहे. पावसाळ्यात रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. मात्र डागडुजीसाठी वापरलेले गट्टी, मुरूम, माती आता बाहेर पडली आहे. वाहन घसरण्याची भीती निर्माण झाली आहे. मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसाने रस्त्याच्या कडेला चिखल जमा झाले होते. ते चिखल आता वाळल्याने त्याला नालीचे रूप प्राप्त झाले आहे.
चामाेर्शी-चाकलपेठ मार्गाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:35 IST