शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

तहसील कार्यालयाला हेलपाटा मारूनही पांदण रस्ता अपूर्ण

By admin | Updated: May 12, 2016 01:37 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यातील चाकलपेठ ते वाघदरा पर्यंतच्या २७०० मीटरच्या पांदण रस्त्याचे काम घेण्यात आले होते.

चार वर्षे उलटली : चाकलपेठच्या शेतकऱ्यांची अडचणचामोर्शी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यातील चाकलपेठ ते वाघदरा पर्यंतच्या २७०० मीटरच्या पांदण रस्त्याचे काम घेण्यात आले होते. या कामाची २४ लाख ६५ हजार ७२१ रूपये अंदाजपत्रकीय किमत आहे. मात्र सदर काम अद्यापही अपूर्ण आहेत. परिणामी शेतकऱ्यांची प्रचंड अडचण होत आहे. सदर कामाची चौकशी करून काम पूर्ण करावे, अशी मागणी चामोर्शीतील प्रभाग क्र. १७ चे नगरसेवक अविनाश चौधरी यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. चाकलपेठ ग्रा. पं. अंतर्गत २०११-१२ या वर्षात चालकपेठ ते वाघदरा या २ हजार ७०० मीटर पांदण रस्त्याला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मंजुरी मिळाली. त्यानंतर लाखो रूपये खर्च करून मातीकाम करण्यात आले. परंतु सदर काम अर्धवटच झाले. मात्र चार वर्षांचा कालावधी उलटूनही सदर काम पूर्ण करण्यात आले नाही.६ मे २०१४ व १७ जून २०१४ मध्ये तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला. या पत्रामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले की, शकुंतला केशरी चौधरी यांच्या शेतापर्यंत मातीकाम झालेले आहे. त्यात ६०० मीटरचा काही भाग काम करणे बाकी आहे. त्यानंतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कुठल्याही हालचाली करण्यात आल्या नाही. १७ मे २०१४ ला मंडळ अधिकारी येणापूर यांना चौकशी अहवाल सादर करण्याबाबत तहसीलदारांचे पत्र मिळूनही कामाची चौकशी झाली नाही. ४ डिसेंबर २०१५ ला तहसीलदारांना पुन्हा अर्ज सादर करण्यात आला. त्यानंतर तहसीलदारांना नायब तहसीलदार येणापूर सर्कल यांना ८ डिसेंबर रोजी कार्यवाही करून अहवाल सादर करण्यासंदर्भात पत्र दिले. तरीही चौकशी झाली नाही. २ मे २०१६ ला तहसीलदारांची भेटी घेऊन काम करण्याची मागणी करण्यात आली. परंतु त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्याबाबत वारंवार तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. मात्र अर्धवट रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले नाही. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी व शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करावी, मे २०१६ अखेरपर्यंत काम तत्काळ पूर्ण करावे, सदर काम पूर्ण न केल्यास चामोर्शीचे तहसीलदार तसेच अतिक्रमणधारक शेतकऱ्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशारा नगरसेवक अविनाश चौधरी यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)