कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात संविधान दिनानिमित्त प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून हा आक्राेश माेर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठविण्यात आले. निवेदनात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदाेन्नतीमध्ये आरक्षण द्यावे, मंत्री गट समितीचे अध्यक्षपद मागासवर्गीय मंत्र्यांना द्यावे, कामगारविराेधी कायदे रद्द करावेत, परदेशी शिक्षणासाठी कर्नाटक राज्याप्रमाणे शिष्यवृत्ती द्यावी, व्यावसायिक व उच्च शिक्षणासाठी फ्री शीप द्यावी, नवीन शैक्षणिक धाेरणात व खासगी विद्यापीठात मागासवर्गीयांना शिष्यवृत्ती व फ्री शीप द्यावी, सरकारी कंपन्या, बॅंकांचे खासगीकरण व कंत्राटीकरण बंद करावे, तेथे नियमानुसार आरक्षण लागू करावे, नाेकरीतील रिक्त पदांचा बॅकलाॅग भरून काढावा, जातीयवादी अत्याचाराचे खटले चालविण्यासाठी तालुकास्तरावर जलदगती न्यायालये निर्माण करावी, मंत्रीगट समितीच्या २००६ च्या शिफारसीप्रमाणे ओबीसींनाही पदाेन्नतीतील आरक्षण लागू करावे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासाठी तत्काळ आयाेग नेमावा, शेतकरी विराेधी कायदे मागे घ्यावेत, लाॅकडाउनमध्ये सर्व गरजूंना माेफत धान्य द्यावे, बारा बलुतेदारांना आर्थिक सहाय्य करावे, खासगी कंपन्यांमध्ये आरक्षण लागू करावे, काेराेनामुळे मृत्यू झालेल्या सरकारी, निमसरकारी व खासगी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत द्यावी, भटक्या विमुक्त जाती-जमाती व बारा बलुतेदारांना क्रिमिलेअरमधून वगळावे, ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे आदी मागण्यांचा यात समावेश हाेता.
निवेदन देताना आरक्षण कृती समितीचे मुख्य संयाेजक फरेंद्र कुतीरकर, सहसंयाेजक गाैतम मेश्राम, देवानंद फुलझेले, भरत येरमे, विजय बन्साेड, सरादू चिराम, माधव गावळ, मनाेज गेडाम, जयश्री येरमे, अशोक मांदाडे, आर. व्ही. आकेवार, विलास निंबाेरकर, राहुल बन्साेड, डाॅ. विजय उईके, डाॅ. हेमराज मसराम, प्रमाेद जनबंधू, डाॅ. संताेष सुरडकर, पी. एन. इंगाेले, संदीप राहाटे, बंडू राठाेड, डाॅ. नारायण करेवार, राज बन्साेड, राेहिदास राऊत, शाम रामटेके, शालिक मानकर, दीपक चाैधरी, दीपक मांडवे, तारका जांभुळकर, झनकलाल मंगर, डाॅ. दिलीप बारसागडे, विजय साळवे, सुरेश किरंगे, प्रा. गाैतम डांगे, धनपाल मिसार, अनिल मुलकलवार, राजेश राेकडे, गुरूदेव नवघडे, बापू मुनघाटे, निलेश खाेब्रागडे, गंगाराम आतला, ईश्वर दर्राे, गजानन बारसागडे, नंदू नराेटे, महेश काेपुलवार यांच्यासह भामरागड, अहेरी, सिराेंचा, काेरची आदी तालुक्यातील कर्मचारी उपस्थित हाेते.