शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आरोप-प्रत्यारोपाने राजकीय धुळवड

By admin | Updated: February 13, 2017 01:57 IST

चामोर्शी तालुक्यात सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. सभांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

चामोर्शी तालुक्यातील स्थिती : केवळ भाजपानेच उभे केले सर्व जागांवर उमेदवार रत्नाकर बोमीडवार   चामोर्शी चामोर्शी तालुक्यात सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. सभांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. ग्रामीण भागात सकाळपासूनच ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून प्रचाराचा आवाज सकाळपासूनच सुरू होत आहे. त्यामुळे चामोर्शी तालुक्यात राजकीय धुळवड उडाली असल्याचे दिसून येत आहे. चामोर्शी तालुक्यात सुमारे ९ जिल्हा परिषद क्षेत्र व १८ पंचायत समिती गण आहेत. केंद्रात व राज्यात सरकार असल्याने भाजपाचे कार्यकर्ते जोमात आहेत. भाजपा चामोर्शी तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागा ताकदीने लढवत आहे. काँग्रेसच्या कुरूळ गणातील उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला. तर फराडा गणातील उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे या जिल्हा परिषद क्षेत्रातील काँगे्रसच्या उमेदवारांना एकाकी लढावे लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीपूर्वी आम्ही सर्व क्षेत्रात तगडे उमेदवार देवू म्हणून सिंहगर्जना केली होती. मात्र याही पक्षाला उमेदवारांची चणचण भासली. भाजपने नाकारलेल्या दोन उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. भाजपच्या उसण्या उमेदवारांमुळे राकाँची लाज राखली गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्यात तीन जिल्हा परिषद क्षेत्र व पाच पंचायत समिती गणात उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेन आष्टी-इल्लूर क्षेत्रात शुभांगी राकेश बेलसरे यांच्या रूपाने लढाऊ उमेदवार रिंगणात उभा केला आहे. शिवसेनेने याव्यतिरिक्त केवळ तीन जिल्हा परिषद क्षेत्र व दोन पंचायत समिती गणातच उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. जनविकास मंचने ९ पैकी ७ जिल्हा परिषद क्षेत्रात व पंचायत समितीच्या १८ पैकी १४ गणात उमेदवार उभे केले आहेत. आजपर्यंत भाजप विरूद्ध काँग्रेस अशी लढत होईल, असे वाटत होते. आता मात्र भाजपाला काँग्रेस, जन विकास मंचच्या उमेदवारांसोबतही सामना करावा लागणार आहे. लखमापूर बोरी-गणपूर क्षेत्रात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. तामदेव दुधबळे यांनी अपक्ष म्हणून रणांगणात उडी घेतली. तसेच विक्रमपूर-फराडा क्षेत्रातही माजी जि. प. अध्यक्ष संध्या दुधबळे अपक्ष लढत आहेत. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रातील लढती रंगतदार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.