शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
4
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
5
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
6
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
7
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
8
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
9
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
10
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
11
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
12
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
13
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
14
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
15
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
16
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
17
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
18
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
19
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

पोलीसदादा, स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 17:00 IST

गेल्या वर्षभरात ९ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. नागरिकांच्या आरोग्यासाठी त्यांना शिस्त लावताना पोलीसदादांना स्वत:चे आरोग्यही सांभाळण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. आतापर्यंत जिल्हा पोलीस दलातील ७७० कर्मचाऱ्यांना कोरोनाने गाठले. त्यापैकी ५२ अधिकारी आहेत. त्यापैकी बहुतांश जणांनी कोरोनावर मात केली असली तरी ९ जण कोरोनाबळी ठरले.

ठळक मुद्देआतापर्यंत नऊ जणांनी गमावले प्राण, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर वाढला पोलिसांवरील ताण

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलविरोधी लढ्यात आघाडीवर राहणाऱ्या जिल्ह्यातील पोलिसांना आता कोरोनाविरुद्धच्या लढ्यातही आघाडीवर राहून परिस्थिती हाताळावी लागत आहे. लॉकडाऊनमध्ये पोलिसांवरील जबाबदारी आणखीच वाढून त्यांचा कोरोबाधितांशी संपर्क वाढत आहे. गेल्या वर्षभरात ९ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. नागरिकांच्या आरोग्यासाठी त्यांना शिस्त लावताना पोलीसदादांना स्वत:चे आरोग्यही सांभाळण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. आतापर्यंत जिल्हा पोलीस दलातील ७७० कर्मचाऱ्यांना कोरोनाने गाठले. त्यापैकी ५२ अधिकारी आहेत. त्यापैकी बहुतांश जणांनी कोरोनावर मात केली असली तरी ९ जण कोरोनाबळी ठरले. बहुतांश पोलीस कर्मचाऱ्यांचा थेट नागरिकांशी संपर्क येत असल्यामुळे कोरोनाच्या विषाणूपासून स्वत:चा बचाव करणे फिल्डवर काम करणाऱ्यांसाठी अत्यंत कठीण बाब झाली आहे. विशेष म्हणजे फ्रंटलाइन वर्कर म्हणून पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुरुवातीलाच लस देण्याचे नियोजन केले होते; पण दुर्गम क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना लस घेण्यासाठी जिल्हा मुख्यालयी किंवा तालुका मुख्यालयावरील केंद्रात जाणेही शक्य झाले नसल्यामुळे अनेक जण लसीपासून वंचित आहेत; पण त्यांच्यासाठी आता थेट त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी किंवा जवळपासच्या आरोग्य केंद्रावर जाऊन लस देण्याचे नियोजन केले जाणार आहे.पोलीस विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, आतापर्यंत २६९० पोलीस कर्मचारी आणि १६५ अधिकाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. याशिवाय ३७३ कर्मचारी आणि ३० अधिकाऱ्यांचा दुसरा डोस घेऊन झाला आहे. मात्र, अजून ४० टक्क्यांच्या आसपास कर्मचारी-अधिकारी लसीच्या प्रतीक्षेत आहेत.लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांना चौकाचौकात रोखताना, त्यांची चौकशी व कारवाई करताना, नाकाबंदीत ड्यूटी करताना पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा नागरिकांशी येणारा संपर्क आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे. 

आई-बाबा, स्वत:ची काळजी घ्या...

पोलीस खात्यात ड्यूटी करताना बाबांना कधी किती वेळ होईल, हे माहीत नसते. बाहेर ते एखाद्या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आले तरी समजत नाही. आम्ही पोलीस क्वॉर्टरच्या मोजक्या जागेत राहतो. त्यामुळे घरी आल्यानंतर सर्वांशीच त्यांचा संपर्क येतो. त्यामुळे स्वत:ची काळजी घ्यावी, एवढीच अपेक्षा आहे.- कृतिका गेडामपोलीस कर्मचाऱ्याची मुलगी

पोलीस खात्यात ड्यूटी करणाऱ्याला वेळेचे बंधन नसते. रात्री-बेरात्री घरी आल्यानंतर ते आंघोळ करू शकत नाही. दररोज कपडेही धुवायला टाकणे शक्य नसते. त्यामुळे आईने कोरोनापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घ्यावी हेच आमचे सांगणे असते. आमचे सर्व नातेवाइकांचे आईला हेच सांगत असतात. - धनंजय पोटावीमहिला पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा

 

टॅग्स :Policeपोलिस