शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस असल्याचे समजून केली ‘त्या’ शिक्षकाची हत्या, नक्षलवाद्यांचा माफीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 05:07 IST

गडचिरोली शहरातील जवाहरलाल नेहरू नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक युगेंद्र मेश्राम यांची १० मार्च रोजी कोरची तालुक्यातल्या ढोलडोंगरी येथील कोंबड बाजारात नक्षल्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.

गडचिरोली - शहरातील जवाहरलाल नेहरू नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक युगेंद्र मेश्राम यांची १० मार्च रोजी कोरची तालुक्यातल्या ढोलडोंगरी येथील कोंबड बाजारात नक्षल्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.या घटनेच्या आठवडाभरानंतर नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोली डिव्हीजन कमिटी सचिवाच्या नावाने आलेल्या पत्रात मेश्रात यांची हत्या चुकीच्या माहितीतून झाल्याचे स्पष्ट करत मेश्राम यांच्या पत्नीची माफी मागितली अहे. आमचे लक्ष्य ते नव्हते, त्यांना पोलीस असल्याचे समजून गोळ्या झाडल्याचे पत्रात म्हटले आहे.मृत शिक्षक युगेंद्र मेश्राम यांची पत्नी कस्तुरबा चंदू देवगडे ही कोरची तालुक्यातल्या बोटेझरी येथे आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे. शिक्षक मेश्राम पत्नीकडे गेले असताना कोंबड बाजारात त्यांच्यावर नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडल्या. यानंतर शाळकरी विद्यार्थ्यांनी काढलेल्या निषेध मोर्चात ‘आमच्या शिक्षकाचा का दोष?’ असा सवाल केला होता. शिक्षक मेश्राम किंवा त्यांचा मुलगा आमचे मुळीच लक्ष्य नव्हते. आमच्या इंटेलिजेन्सच्या चुकीमुळे सदर हत्येची घटना घडली. मान झुकवून आम्ही आपल्या कुटुंबियांची माफी मागतो, असा मजकूर त्या पत्रात नमूद आहे.आरोग्य विभागाचे कर्मचारी, शिक्षक व पत्रकारांचीसुद्धा नक्षलवाद्यांनी या पत्राच्या माध्यमातून जाहीर माफी मागितली आहे. सर्वसामान्य नागरिकांनी दहशतीत राहू नये. अन्यायकारक व्यवस्थेच्या विरोधात लढा उभारणे हे आमचे काम आहे, असा आशय पत्रात नमूद केला आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली