शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी गंभीर प्रकरण दडपले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 23:35 IST

आपली मुलगी मोनिका किरण जंबेवार हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याने सासरच्या मंडळीविरोधात आपण गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी सदर प्रकरणाची योग्य चौकशी न करता हे प्रकरण दडपले असल्याचा आरोप मृतक मुलीच्या आई-वडिलासह बसपाचे पदाधिकारी रमेश मडावी, ....

ठळक मुद्देआई-वडिलांसह पदाधिकाऱ्यांचा आरोप : गर्भवती महिलेचा संशयास्पद मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आपली मुलगी मोनिका किरण जंबेवार हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याने सासरच्या मंडळीविरोधात आपण गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी सदर प्रकरणाची योग्य चौकशी न करता हे प्रकरण दडपले असल्याचा आरोप मृतक मुलीच्या आई-वडिलासह बसपाचे पदाधिकारी रमेश मडावी, आप पक्षाचे पदाधिकारी प्रा.अशोक लांजेवार यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला.यावेळी संजय मादेशवार, कृष्णा वाघाडे, विजय गणवेनवार, अन्यायग्रस्त कुटुंबिय, संजीत पाल, कमला पाल, रंजीत पाल आदी उपस्थित होते.यावेळी माहिती देताना कोटगल येथील पाल कुटुंबियांनी सांगितले की, आमची मुलगी मोनिका हिचा आंतरजातीय प्रेमविवाह गडचिरोली येथील किरण जंबेवार यांच्याशी २०१६ मध्ये झाला. मुलगी जंबेवार यांच्या घरी व्यवस्थित नांदत असूनही तिला सासू-सासरे व जावयाकडून नेहमी त्रास दिला जात होता. अशाही परिस्थितीत आपण जावयाला अनेकदा मदत म्हणून पैसे दिले. लग्न झाल्यावर सहा महिन्यानंतर जावई व त्याच्या आई-वडिलांनी आपली मुलगी मोनिका हिच्याशी पुन्हा भांडण करून घरातून काढून दिले. एक महिना आमच्या घरी राहिल्यानंतर आमच्या नातेवाईकांनी जावयाला समजावून मोनिकाला सासरी नेऊन दिले. दरम्यान मोनिका गर्भवती राहिली. त्यानंतरही तिला त्रास देणे सुरूच होते. २८ सप्टेंबर २०१७ ला खासगी दवाखान्यात मोनिकाला भरती केल्याचे जावयांनी फोनवरून सांगितले. त्यानंतर जिल्हा रूग्णालयात ती मरण पावली, असे सांगण्यात आले. संशयास्पद मृत्यू झाल्याने पोलिसांत आम्ही तक्रार दिली. मात्र तीन महिन्यांचा कालावधी होऊनही जावई, सासू-सासरे यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही, असे सांगितले.अन्यायग्रस्त कुटुंबियांना न्याय न मिळाल्यास न्यायालयात धाव घेण्याचा इशारा प्रा. अशोक लांजेवार यांनी पत्रकार परिषदेला दिला.

टॅग्स :Policeपोलिस