शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरीच्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

By admin | Updated: May 23, 2016 01:27 IST

आरमोरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सदस्य असलेल्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर एका पोलीस महिला कर्मचाऱ्याची बदनामी करणारा संदेश पाठविल्या प्रकरणी

आरोपी फरार : बदनामीकारक संदेश व्हॉटस्अ‍ॅपवर पाठविलाआरमोरी : आरमोरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सदस्य असलेल्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर एका पोलीस महिला कर्मचाऱ्याची बदनामी करणारा संदेश पाठविल्या प्रकरणी आरमोरी पोलिसांनी आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नारायण बच्चलवार (५२) यांचेवर भादंविचे कलम ५०९ अन्वये रविवारी गुन्हा दाखल केला आहे.आरोपी पोलीस उपनिरिक्षक नारायण बच्चलवार यांच्या आरमोरी व गडचिरोली येथील राहत्या घरी आरमोरी पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. बच्चलवार गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. कर्तव्यात गंभीर प्रकारची कसूर केल्यामुळे आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नारायण बच्चलवार यांची धानोरा येथील पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली. मात्र सदर चौकशी एका महिला पोलीस अंमलदाराच्या हस्तक्षेपामुळे सुरू करण्यात आली, असा समज करून पोलीस उपनिरीक्षक बच्चलवार यांनी १५ मे २०१६ रोजी रात्री ८.५० वाजता आरमोरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सदस्य असलेल्या कार्यालयीन व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर महिला पोलीस कर्मचाऱ्याची बदनामी करणारा संदेश पाठविला. त्यामुळे पोलिसांनी बच्चलवार याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.(शहर प्रतिनिधी)