शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
2
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
3
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
4
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
5
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
6
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
7
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
8
धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
9
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!
10
"कॉम्प्रोमाइज कर तुला रोल देतो", टीव्ही अभिनेत्याला दिग्दर्शकाने दिलेली ऑफर, केला धक्कादायक खुलासा
11
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
12
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
13
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
14
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
15
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
17
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
18
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
19
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
20
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?

वीर शहिदांना पोलीस दलाची मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 05:00 IST

राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, अपर पोलीस महासंचालक (विशेष अभियान) राजेंदर सिंग, विशेष पोलीस महानिरिक्षक रवींद्र कदम, पोलीस महाउपनिरिक्षक महादेव तांबडे, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते. पोलीस महासंचालक हे काही कामानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात आले होते.

ठळक मुद्देमहासंचालकांची उपस्थिती : कुटुंबीयांचे सांत्वन; उपनिरीक्षक होनमाने यांचे पार्थिव मूळगावी रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलवाद्यांशी लढताना प्राणाची आहुती देणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने आणि जवान किशोर आत्राम यांना रविवारी सायंकाळी पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात भावपूर्ण वातावरणात मानवंदना देऊन श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, अपर पोलीस महासंचालक (विशेष अभियान) राजेंदर सिंग, विशेष पोलीस महानिरिक्षक रवींद्र कदम, पोलीस महाउपनिरिक्षक महादेव तांबडे, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते. पोलीस महासंचालक हे काही कामानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात आले होते. दोन जवान शहीद झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी गडचिरोली गाठून शहीदांना मानवंदना दिली. तसेच किशोर आत्राम यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. दोघांचेही पार्थिव त्यांच्या स्वगावी रवाना करण्यात आले आहेत. किशोर आत्राम हे मूळचे भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.पालकमंत्र्यांनी पाठविला शोकसंदेशपालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करत शहीदांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. शहीद जवानांच्या कुटुंबियांची परवड होणार नाही, यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल. नक्षलवाद संपविण्यासाठी पोलीस लढा देत आहेत. या घटनेमुळे पोलिसांनी खचून न जाता नक्षलवाद्यांचा खात्मा करावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

टॅग्स :Policeपोलिस