शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीशांना धमकावणाऱ्या पोलिस निरीक्षकास अटक; विरोधात आदेश दिल्याच्या रागातून कृत्य 

By संजय तिपाले | Updated: June 3, 2023 19:41 IST

विरोधात आदेश दिल्याच्या रागातून न्यायाधीशांना घरी जाऊन धमकावल्याच्या प्रकरणात वादग्रस्त पोलिस निरीक्षक राजेश खांडवेला पोलिसांनी अटक केली.  

गडचिरोली: विरोधात आदेश दिल्याच्या रागातून न्यायाधीशांना घरी जाऊन धमकावल्याच्या प्रकरणात वादग्रस्त पोलिस निरीक्षक राजेश खांडवेला पोलिसांनी अटक केली.  न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची चंद्रपूरच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, या कारवाईबाबत पोलिसांनी मोठी गोपनियता बाळगली. 

चामोर्शी बाजार समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत २० एप्रिल रोजी  पहाटे ठाण्यात बोलावून लाथाबुक्क्या व बुटाने मारहाण केल्याचा दावा सभापती अतुल गण्यारपवार यांनी पोलिस निरीक्षक राजेश खांडवेवर केला होता.  खांडवेवर गुन्हा नोंदविण्यासह बडतर्फीच्या कारवाईसाठी चामोर्शीत आंदोलन झाले होते. त्यानंतर गण्यारपवारांनी चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाद मागितली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. मेश्राम यांनी  २० मे रोजी पो. नि. राजेश खांडवेवर कलम २९४, ३२४, ३२६, ३४२ भादंविनुसार गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. दरम्यान, २५ मे रोजी सकाळी पो. नि. खांडवे हा न्या. मेश्राम यांच्या निवासस्थानी गेला. माझ्याविरोधात गुन्हा नोंदविण्याचा आदेश का दिला, अशी विचारणा केली. त्यावर समजावण्याचा प्रयत्न केला. आपिलात जाण्याची संधी आहे, असे न्या. मेश्राम यांनी समजावले. मात्र, त्यानंतर खांडवेने  हुज्जत घालून धमकावल्याप्रकरणी पो.नि.खांडवेविरुध्द कलम ३२३, ३५३, ४५२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. 

 झाले होते तडकाफडकी निलंबनया घटनेनंतर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी तातडीने वेगवान हालचाली केल्या. न्या. मेश्राम यांची गडचिरोली ठाण्यात फिर्याद नोंदवून गुन्हा चामोर्शी ठाण्यात वर्ग केला, त्यानंतर  पो. नि. खांडवेला तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते. गुन्हा उपअधीक्षकदर्जाच्या अधिकाऱ्रूांकडे सोपविला. गडचिरोलीतून घेतले ताब्यातदरम्यान, पाे.नि. राजेश खांडवेला २ जून रोजी उपअधीक्षक साहील झरकर यांनी गडचिरोलीतून ताब्यात घेतले. दुपारी चामोर्शी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर खांडवेची रवानगी चंद्रपूर येथील जिल्हा कारागृहात करण्यात आली. या कारवाईला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली