शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस दलाने मिळवून दिला १४० तरुणांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 05:00 IST

पोलीस विभाग आणि एम्स प्रोटेक्शन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.२८) पोलीस विभागाच्या सभागृहात त्या निवड झालेल्या युवकांचा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले. या काऱ्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया (अभियान), अपर पोलीस अधीक्षक समीर शेख (प्रशासन) अपर पोलीस अधीक्षक समय्या मुंडे (प्राणहिता, अहेरी) तसेच एम्स प्रोटेक्शन सर्व्हिस कंपनीचे संचालक मल्लेश यादव उपस्थित होते. 

ठळक मुद्देहैदराबादमध्ये देणार सेवा, पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सत्कार

  लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ज्या तरुणांनी कधी जिल्ह्याच्या बाहेरची दुनिया पाहिली नाही त्या दुर्गम भागातील १४० होतकरू बेरोजगार युवकांना हैदराबादसारख्या शहरात सुरक्षा रक्षकाची नोकरी लावून देण्यासाठी पोलीस विभागाने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमामुळे त्या युवकांच्या जीवनाला वेगळीच कलाटणी मिळणार असून दुर्गम भागातील नागरिकांना आर्थिक विकासाचा नवीन आशेचा किरण यानिमित्ताने दिसणार आहे.पोलीस विभाग आणि एम्स प्रोटेक्शन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.२८) पोलीस विभागाच्या सभागृहात त्या निवड झालेल्या युवकांचा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले. या काऱ्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया (अभियान), अपर पोलीस अधीक्षक समीर शेख (प्रशासन) अपर पोलीस अधीक्षक समय्या मुंडे (प्राणहिता, अहेरी) तसेच एम्स प्रोटेक्शन सर्व्हिस कंपनीचे संचालक मल्लेश यादव उपस्थित होते. जिल्ह्यातील बेरोजगारांना नोकरीची संधी मिळावी यासाठी गडचिरोली पोलीस दलाने रोजगार मेळावा ॲप तयार केले. या ॲपच्या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणांनी नाव नोंदणी केली. त्यानुसार जिमलगट्टा, कुरखेडा, पेंढरी, अहेरी, गडचिरोली आदी उपविभागांतर्गत येणाऱ्या दुर्गम गावांमधील १४० बेरोजगारांना हैदराबादच्या एजन्सीत सुरक्षा रक्षक म्हणून संधी मिळाली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनीही आनंद व्यक्त केला. या काऱ्यक्रमासाठी संबंधित उपविभागातील पोलीस अधिकाऱ्यांसल नागरी कृती शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

विकासासाठी ठरणार मैलाचा दगडनक्षलवादी जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे आणून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतात. तसेच त्यांची दिशाभूल करून दलममध्ये भरती करून त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करतात. त्यामुळे अनेक तरुण गुणवत्ता असूनही रोजगारापासून वंचित राहीले आहेत. पण त्या तरुणांचे उज्वल भवितव्य घडविण्यासाठी पोलीस अधीक्षक गोयल यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात राबविला गेलेला हा उपक्रम नक्षलविरोधी अभियानासाठी आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या विकासाला चालना देण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. जिल्ह्यात माेठ्या प्रमाणावर असलेली बेराेजगारीची समस्या आणि त्याचा नक्षलवाद्यांकडून घेतला जाणारा गैरफायदा टाळण्यासाठी पाेलीस विभागाने राबविलेल्या या उपक्रमाचे स्वागत हाेत आहे. 

टॅग्स :Policeपोलिस