साहित्य वाटप : चातगाव, अहेरी, जिमलगट्टा, धानोरा, कारवाफा, कुरखेडा येथे मेळावा गडचिरोली : २८ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत नक्षली सप्ताह जिल्ह्यात पाळला जात आहे. या सप्ताहात जिल्ह्यात नक्षली कारवाया घडू नयेत, शांतता व सुव्यवस्था टिकून राहावी याकरिता पोलीस विभागाच्या वतीने ठिकठिकाणी शांतता रॅली व मेळावे आयोजित करून जनसंपर्कावर भर दिला जात आहे. गडचिरोली - अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने गडचिरोली, धानोरा, कुरखेडा तालुक्यात आयोजित शांतता मेळाव्यात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी बुवाबाजी, मंत्रोच्चार यासह विविध प्रात्यक्षिक सादर करून अंधश्रद्धा निर्मूलन करण्यात आली. अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास निंबोरकर, प्रधान सचिव पुरूषोत्तम ठाकरे, शीतल मानकर, शुभम चौधरी, मारोती आभारे, सचिन भोयर यांनी विविध प्रात्यक्षिके सादर करून आदिवासी बांधवांमध्ये अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला. आदिवासींनी पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावे, असे आवाहनही केले. कुरखेडा येथेही जनजागृती कार्यक्रमाचे आयोेजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के, तांबोळे, पीएसआय गिरी, धानोरा येथील कार्यक्रमाला एसडीपीओ अजीत टिके, अमोल वडसंग तसेच कारवाफा येथील कार्यक्रमाला एसडीपीओ गणेश इंगळे, पीएसआय लाकडे, चव्हाण उपस्थित होते. जिमलगट्टा - उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जिमलगट्टाच्या वतीने शांतता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैैद्यकीय अधिकारी डॉ. अमित ढगे, वनपरिक्षेत्राधिकारी भिसे, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक हेमने, मुख्याध्यापक गुंड, संजय गज्जलवार, उपसरपंच नैताम उपस्थित होते. सुशिक्षित समाज प्रगतीच्या वाटेवर चालू लागतो. त्यामुळे आपल्या प्रगतीच्या आड येणाऱ्या नक्षलवाद्यांचा सामूहिकरित्या विरोध करा, पुढील पिढीला मुक्त वातावरणात वावरू देण्यासाठी भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी केले. मेळाव्यात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच कृषी विभागाच्या वतीने नागरिकांना योजनांची माहिती देण्यात आली. आदिवासी विकास विभागाच्या वतीने निरीक्ष मट्टामी यांच्यातर्फे नागरिकांना अर्जाचे वितरण करण्यात आले. तसेच आदिवासी बांधवांना भेटवस्तू व ब्लँकेटही वितरित करण्यात आले. मेळाव्याला दामरंचा, देचलीपेठा, रेपनपल्ली, जिमलगट्टा परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी पीएसआय संदीप वांगणेकर, गायकवाड, सुरवसे, बिराजदार, सिसाळ यांनी सहकार्य केले. चातगाव - चातगाव पोलीस मदत केंद्राच्या वतीने गावातून शांतता रॅली काढण्यात आली. त्यानंतर पोलीस मदत केंद्रात शांती मेळावा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी पोलीस अधिकारी सूर्यवंशी, प्रमुख अतिथी म्हणून सीआरपीएफ ११३ बटालियनचे कमांडंट शैैलेंद्र सिंग, पीएसआय अमरजीत सिंग, जाधव, एन. डी. पुसदेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पीएसआय जाधव यांनी केले. रॅलीत पोरेड्डीवार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ, पोलीस, सीआरपीएफ जवान सहभागी झाले होते. अहेरी - स्थानिक माता कन्यका परमेश्वरी देवस्थान हॉलमध्ये पोलीस विभागाच्या वतीने शांती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अप्पर पोलीस अधीक्षक आर. राजा होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश धुमाळ, पोलीस निरीक्षक संजय मोरे, पोलीस उपनिरीक्षक तांबुस्कर, महेबुब अली, डॉ. नीलिमा सिंह, पीएसआय नीलेश सोळंके, पत्रकार विवेक बेझलवार, रोमित तोंबर्लावार, प्रकाश दुर्गे उपस्थित होते. २७ ते ३० जुलैपर्यंत शांती मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या समारोपीय कार्यक्रमात शनिवारी नागरिकांना विविध विभागातर्फे योजनांची माहिती देऊन विविध वस्तूंचे वितरण करण्यात आले. दरम्यान आरोग्यविषयक, आपत्ती व्यवस्थापनविषयक, पेसा कायदा, पथनाट्य, चित्रपट, अंधश्रद्धा निर्मूलन, योगा, क्रीडास्पर्धा व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला तालुक्याच्या दुर्गम भागातून जवळपास २५० नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाचे संचालन पीएसआय रोशन रावराणे, प्रास्ताविक सहायक पोलीस उपनिरीक्षक भगवान करमरकर तर आभार भूषण पोटवडे यांनी मानले.
जनसंपर्कावर पोलिसांचा भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 02:14 IST