शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

पोलिसांचा दारूमाफियांना दणका, दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 15:10 IST

आचारसंहिता कालावधीत ३८५ गुन्हे : ४०० जणांना केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही आचारसंहिता कालावधीत मोठ्या प्रमाणात दारू फेसाळली. पोलिसांनी ३८५ गुन्हे नोंदवून दारूविक्री व तस्करी प्रकरणात ४०० जणांना अटक केली. सुमारे दीड कोटी रुपयांची दारू जप्त केली आहे.

जिल्ह्यात दारूबंदी असल्याने शेजारच्या जिल्ह्यातून तसेच तेलंगणा व छत्तीसगडमधून दारूची आवक होते. या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागात नाकाबंदी केली होती. मात्र, आचारसंहिता कालावधीत छुप्या मार्गाने दारू आली. पोलिसांनी ठिकठिकाणी कारवाया करून ३८५ गुन्हे नोंद केले. यात १ कोटी ५२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

४५८ केंद्रांवर पथकांना करावी लागणार पायपीट

  • जिल्ह्याची भौगोलिक स्थिती कठीण आहे. जंगलव्याप्त व दुर्गम, अतिदुर्गम भागात निवडणूक पथकांचा कर्तव्य बजावताना कस लागणार आहे. एकूण ९७२ पैकी तब्बल ४५८ मतदान केंद्रांवर जाण्यासाठी पथकांना जंगलातून पायपीट करावी लागेल.
  • मतदान साहित्यासह या सर्वांना जवानांच्या कडक सुरक्षाव्यवस्थेत मतदान केंद्रावर पोहोचविताना दोन रात्री जंगलात कडाक्याच्या थंडीत मुक्काम देखील करावा लागणार आहे.
  • काहीजणांना दोन ते तीन ३ किलोमीटर, तर काही पथकांना ३२ ते ३४ किलोमीटर पायी जावे लागणार आहे. पथकाला थंडीमुळे गरम कपडे, टॉर्च, औषधी व इतर मूलभूत साहित्य पुरविले आहे.

 

  • १६ हजार पोलिसांचा फौजफाटा जिल्ह्यात निवडणुकीसाठी तैनात राहणार आहे.
  • २९७९ पोलिसांनी टपाली मतदान करून हक्क बजावला
  • १७० आत्मसमर्पित माओवादी देखील लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. ते सर्व जण मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 

निवडणूक पथकांच्या कारवाया अशा.... याशिवाय तिन्ही विधानसभा क्षेत्रात निवडणूक विभागाने नियुक्त केलेल्या स्थिर व फिरत्या पथकांनीही कारवाया केल्या. यात साडेसात लाख रुपयांची रोकड जप्त केली. ३ लाख ७९ हजार ३६४ रुपयांची ७५० लिटर दारू व इतर साहित्य असा सुमारे ९ लाख ९७ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. एकूण २८ प्रकरणांत २६ गुन्हे नोंदविण्यात आले.

 

  • आरमोरी

दारूसह इतर साहित्य असा एकूण २ लाख ८८ हजार २८९ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात. पाच गुन्हे नोंद.

दारू व इतर साहित्य मिळून साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. १० गुन्हे नोंद करण्यात आले.

  • अहेरी

दारूसह इतर साहित्य असा एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात, १३ प्रकरणांत ११ गुन्हे नोंद.

कर्तव्यात हयगय अंगलट, ६ कर्मचाऱ्यांवर गुन्हा निवडणूक कामात हलगर्जी केल्याबद्दल अहेरी व गडचिरोली दोन गुन्हे नोंदविण्यात आले. अहेरीत ५ व गडचिरोलीत एक अशा एकूण ६ कर्मचाऱ्यांवर याद्वारे कारवाई करण्यात आली.

पाच हेलिकॉप्टर प्रशासनाच्या ताफ्यात निवडणुकीसाठी २११ पथकांना मतदान केंद्रांवर हेलिकॉप्टरद्वारे पोहोचविण्यात येणार आहे. १७ रोजी १५३ केंद्रांवरील ६५० कर्मचाऱ्यांना पाठविले होते. १९ रोजी उर्वरित ५८ पथकांना रवाना केले जाणार आहे. याकरिता जिल्हा पोलिस दलाकडे आधीच दोन हेलिकॉप्टर उपलब्ध असून निवडणुकीसाठी भारतीय वायूसेनेचे ३, तर भारतीय लष्कराचे २ असे पाच हेलिकॉप्टर आले आहेत

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली