शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

 सव्वा दाेन लाखांची दारू नेणारी कार पाेलिसांनी पकडली; गडचिराेलीच्या फुले वार्डातील कारवाई

By दिलीप दहेलकर | Updated: February 18, 2024 18:30 IST

दारू विक्रेत्याकडील एकूण ७ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गडचिरोली: आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात दारूमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहर पोलिस स्टेशन ॲक्शन मोडवर आले असून दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, पाेलिसांनी १८ फेब्रुवारी राेजी रविवारला सकाळी शहरातील फुले वॉर्डात कारवाई करत सव्वा दाेन लाखांची दारू नेणारी कार पकडली.

दारू विक्रेत्याकडील एकूण ७ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणातील दारु विक्रेता दिनेश गिरीधर मोहुर्ले (३२) रा. फुले वॉर्ड हा पळून जाण्यात यशस्वी झाला. गडचिरोली शहर पोलिसांच्या डीबी पथकाने केलेल्या या कारवाईमुळे शहरातील दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नवनियुक्त उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वाखाली धनंजय चौधरी, अविनाश लंजे, वृषाली चव्हाण, भाऊराव बोरकर यांनी ही कारवाई केली. 

किरकाेळ विक्रेत्यांना पोहोचण्यासाठी दारूची तस्करीदिनेश मोहुर्ले हा शहरातील चिल्लर विक्रेत्यांना कारच्या साहाय्याने दारू पोहोचवित होता. याची गोपनीय माहिती गडचिरोली शहर पोलिसांना मिळाली. त्याआधारे डीबी पथकाने शहरातील फुले वॉर्डात सापळा रचला. दरम्यान, सर्वोदय वॉर्डातून रायपुरे चौकाकडे एक कार संशयास्पदरित्या येताना दिसली. पोलिसांनी कार थांबवून तपासणी केली असता कारमध्ये देशी दारूचे बॉक्स आढळून आले. पोलिसांनी २ लाख ३४ हजार रुपये किंमतीच्या देशी दारूचे ३९ बॉक्स आणि एमएच ३१ ईके -१३७४  क्रमांकाची ४ लाख ८० हजार रुपये किंमतीची कार असा एकूण ७ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आगामी काळात विविध सणांसोबतच लोकसभा निवडणुक होणार आहे. अशा परिस्थितीत पोलिस स्टेशन परिसरात दारूविक्रीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच सण व निवडणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी शहर पोलिसांकडून दारूविक्रेत्यांवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. सदर माेहिमेला आणखी गती देण्यात येणार आहे. - अरूण फेगडे, पाेलिस निरीक्षक, गडचिरोली

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली