शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
4
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
5
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
6
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
7
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
8
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
9
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
10
उसाच्या फडातून येतो गुरगुरण्याचा आवाज अन् उडतो जिवाचा थरकाप; शेतात मजूर मिळेनात
11
देवदर्शनाचा प्रवास अंतिम ठरला! टायर फुटला अन् ३ निष्पाप ठार; अणदूरनजीक दुर्घटनेत ११ गंभीर जखमी
12
दिवाळखोरीच्या आड पोटगी कुठल्याही परिस्थितीत टाळता येणार नाही - हायकोर्ट
13
बिबट्याच्या भीतीने शेतात जनावरे चरायला सोडणेही झाले बंद; लोकांच्या राहणीमानात बदल
14
माणसं आली पिंजऱ्यात, बिबट्या मात्र मोकाट! भय इथले संपत नाही, सायंकाळी ६ च्या आत सगळेच घरात
15
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
16
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
17
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
18
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
19
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
20
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
Daily Top 2Weekly Top 5

नांगरणीचे दर चढतीवर, शेतकऱ्यांना तासाला मोजावे लागणार एक हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 16:36 IST

Gadchiroli : ग्रामीण भागात आता ट्रॅक्टरची संख्या वाढली असून अनेकांना यातून रोजगार मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतजमिनीत ओलावा निर्माण झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण भागातील शेतकरी शेतनांगरणीची कामे करताना दिसून येत आहेत. आधुनिक काळात वेळेची बचत म्हणून शेतकरी नांगरणीसाठी ट्रॅक्टरचा वापर करीत आहेत; मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही नांगरणीचे दर चढतीवर आहेत. ट्रॅक्टर मालकांद्वारे प्रति तास एक हजार रुपये भाडे घेतले जात आहे. धान लागवडीचा खर्च वाढल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

रब्बी पीक निघाल्यावर शेतकरी शेतजमीन नांगरणी करून ठेवत असतात. मार्चनंतर एप्रिल महिन्यात अधूनमधून अवकाळी पाऊस कोसळत आहे. पावसाच्या सरीमुळे अनेक भागातील शेतजमिनीत ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतजमीन नांगरणी योग्य वाटताच नांगरणी करण्याचे काम शेतकऱ्यांनी हाती घेतले आहे. शेतशिवारात सकाळच्या सुमारास ट्रॅक्टरचे सूर कानी पडत आहेत. तर काही शेतकरी बैलजोडीच्या साहाय्याने नांगरणी करीत आहेत.

सध्या शेतातील कामे सर्रास ट्रॅक्टरने केली जात आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांना रोजगार उपलब्ध होऊन आर्थिक उत्पन्न मिळत आहे. शेतकरी रब्बी हंगाम संपल्यावर शेतातील पाळे व धुन्ऱ्याची दुरुस्ती करीत असतात. त्यानंतर मातीकाम केले जाते. शेतशिवार स्वच्छतेवर भर असतो.

जमीन सुपीकतेसाठी मेंढ्याचा आधार

  • पिकाची वाढ व्हावी, यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असतात. तसेच दरवर्षी शेणखतही टाकत असतात. तर काही शेतकरी जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी मॅढ्यांचे कळप शेतात बसवित असतात.
  • सध्या शेतशिवार मोकळे असल्याने मेंढ्यांचे कळप बसविणे सोयीचे ठरत आहे. मेंढ्यांच्या संख्येनुसार शेतकऱ्यांना मॅडी मालकांना दाम द्यावे लागते. शेतशिवारात मेंढ्यांचे कळप बसलेले दिसून येत आहेत.

"ट्रॅक्टर मालकांनी नांगरणीचे भाडे वाढविल्यामुळे शेती करणेच परवडेनासे झाले आहे. शेतीचा खर्च सातत्याने वाढत असताना हमीभाव उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याने खर्च भरून निघत नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करावी."- दिलीप कुथे, शेतकरी, कान्होली.

"डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. तसेच चालकांना किमान ५०० रुपये प्रति दिवस द्यावे लागते. ट्रॅक्टर दुरुस्ती खर्च सुद्धा वाढला असल्याने प्रति तास एक हजार रुपये भाडे आकारण्यात येत आहे."- राहुल हुलके, ट्रॅक्टर मालक.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली